क्राइम

अर्ध्या रात्री बॅग घेऊन पोलिस ठाण्यात पोहचला इसम, त्याचे बोलणे ऐकून पोलिस चक्रावले

Spread the love

त्रिशूर ( केरळ )/ नवप्रहार ब्युरो 

            एक इसम खांद्यावर लटकेवलेली सॅक बॅग घेऊन पोलिस ठाण्यात पोहचतो. त्याला इतक्या रात्री ठाण्यात पाहून पोलिसांना प्रश्न पडतो की हा इतक्या रात्री ठाण्यात का बरं आला असेल ?  त्याला पोलिस शांतपणे विचारणा करतात. त्यावर तो जे उत्तर देतो ते ऐकून पोलिस देखील चाकरवतात. प्रकरण केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील पुडुक्कड येथील आहे.

२५ वर्षीय बाविन नावाचा युवक रविवारी रात्री १२:३० च्या सुमारास दारूच्या नशेत पुडुक्कड पोलीस ठाण्यात एका बॅगेसह पोहोचला. त्यानं पोलिसांना सांगितलं की, या बॅगेत माझ्या आणि माझी २३ वर्षीय जोडीदार अनिशा यांच्यातील दोन नवजात बाळांची हाडं आहेत. अनिशा एका खासगी रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होती.

फॉरेन्सिक अहवालात काय?

त्रिशूर ग्रामीण पोलिस अधीक्षक बी. कृष्णकुमार यांनी सांगितलं की, हाडांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून ती नवजात बालकांची असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली.

आठ महिन्यांनंतर बाळाची हाडं खोदून काढली

प्राथमिक चौकशीत अनिशानं सुरुवातीला नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या पहिल्या मुलाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, नाभीसंबंधी नाडी गळ्यात अडकल्याने बाळ दगावले. मात्र, नंतर तिने कबूल केले की बाळ जिवंत जन्मले होते आणि त्याचा गुदमरून खून करण्यात आला. मृतदेह घराजवळच पुरण्यात आला आणि आठ महिन्यांनंतर मी बाळाची हाडं खोदून बाविनला दिली. यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये जन्मलेल्या दुसऱ्या नवजात बाळाचाही बाविनने खून केला आणि त्याचेही शव दुसऱ्या ठिकाणी गुप्तपणे पुरले.

विधीच्या नावाखाली साठवली हाडं

बाविनने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, दोन्ही बाळांच्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी विधी करण्याचा हेतू होता, म्हणून हाडं त्यानं साठवून ठेवली होती. सध्या पोलिस अनिशाच्या कुटुंबीयांना गर्भधारणेबाबत काही माहिती होती का, याचाही तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला असून हाडांची डीएनए चाचणीही सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close