माऊली संस्थेचा स्तुत्य उपक्रम
पूरग्रस्त महिलांना सॅनिटरी पॅड्स आणि बालकांना शैक्षणिक साहित्याचे केले वाटप
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी-पुरामुळे नुकसान झालेल्या शहरांतील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना माऊली बहुउद्देशीय संस्था,घाटंजी च्या वतीने मदतीचा हात देण्यात आला.यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शहरात तसेच ग्रामीण भागातील नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, क्षणातच गावच्यागाव जलमय झाली. घरातील अन्नधान्य, संसारोपयोगी सामान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य,आयुष्यभर कमविलेले जमापुंजी, आणि आयुष्यातील त्यांच्या दृष्टीकोनातून असलेल्या सर्व महत्वपूर्ण गोष्टी काही वेळात नाहीश्या झाल्या. जिल्ह्यातील या नागरिकांवर आलेल्या कठीण समयी या कुटुंबातली महिलांनच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असलेली सॅनिटरी पॅड्स आणि बालकांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत माऊली बहुउद्देशीय संस्था, घाटंजी च्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आली आहे. सोबतच पूरपरिस्थितीमुळे नागरिकांची अवस्था गंभीर झाली होती.पुरग्रस्तांना जेवणाची व्यवस्थाही या तरुणांनी स्वतः स्वयंपाक शिजवून नागरिकांना दिली,हे विशेष. यासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला.तसेच मासिक पाळी वेळी महिलांनी कुठली काळजी आणि स्वच्छ्ता ठेवावी तसेच सॅनिटरी पॅड्स वापराबाबत जनजागृती यावेळी करण्यात आली.पुरग्रस्तांना संघर्षाच्या समयी एक नवी आशेची किरण, नक्की या उपक्रमामुळे मिळालेली आहे.सदर उपक्रमासाठी आकाश बुर्रेवार, जी.एन.यदूनार वनरक्षक,
जयश्री कापसे,मेघाराणी,विक्की ढवळे, श्वेता बोडेवार,आदींनी परिश्रम घेतले.
संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गरजवंत व्यक्तीला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आमचा असतो. महिलांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असलेली सॅनिटरी पॅड्स आणि बालकांना शैक्षणिक साहित्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू ज्यांची त्यांना जास्त गरज आहे ते आम्ही त्यांना दिल्या.पुढेही त्यांना संस्थेमार्फत आवश्यक ती मदत करण्यात येईल असे मत माऊली संस्थेचे संस्थापक आकाश बुर्रेवार यांनी मांडले.