राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती ग्रामीणच्या उपजिल्हाप्रमुखपदी सुरज देशमुख यांची नियुक्ती
प्रतिनिधी / अमरावती
आदरणीय जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार शरदचंद्र पवार यांच्या विचाराला बांधील राहून पक्ष संघटनेसाठी प्रयत्नशील राहण्याकरिता युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती ग्रामीण उपजिल्हाप्रमुख पदी सूरज देशमुख याची नेमणूक करण्यात आली जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे व सर्वसामान्यांच्या व्यथा शासन दरबारी नेऊन पाठपुरावा करण्यामध्ये माहीर असलेले समाजसेवक तथा पत्रकार सुरज देशमुख यांची नुकतीच आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती ग्रामीणच्या उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेल राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असे नियुक्ती देतेवेळी सुरज देशमुख यांनी व्यक्त केले उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे तालुक्यातून व जिल्हाभरातून विविध कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या पुढील यशस्वी कारकीर्द पार पाडण्यासाठी आशीर्वाद दिले यावेळी रोहित पवार सुरज देशमुख शिवराज वाकोडे अनिकेत उन्नतकर सह पदाधिकारी उपस्थित होते