शाशकीय

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Spread the love

सचिन महाजन प्रतिनिधी हिंगणघाट 

हिंगणघाट:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या.
पदनियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय वर्धा येथे सपन्न झाला असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रदेश सरचिटणीस तथा नागपूर जिल्हा निरीक्षक ‘अतुल वांदिले’, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, युवक जिल्हाध्यक्ष संदीप किटे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अशोक डगवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अधिक बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून तुम्हा सर्वांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे या संधीच सोन तुम्हाला करायचं आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक जिल्हा सचिवपदी *हर्षल जेम्स सॅम्युअल*, युवक जिल्हा महासचिवपदी *अमोल चंदनखेडे*, युवक जिल्हा उपाध्यक्षपदी *गुरूदयालसिंग जुनी*, युवक जिल्हा उपाध्यक्षपदी *सोनू मेश्राम* यांची नियुक्ती करत यांच्यावर जिल्ह्यात विविध भागात पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत , युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, युवक जिल्हाध्यक्ष संदीप किटे, यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी जोरकसपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी सुनील भूते, राजू मुडे नितीन भूते, सुरेश महाजन, सतीश कारमोरे, सचिन महाजन, याकिब सय्यद, दिनकर शिंदे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close