क्राइम

जनतेला कोट्यवधींचा गंडा घालून पसार असलेल्या आरोपी बाबत माहिती देण्याचे आवाहन

Spread the love

आर्थिक गुन्हेशाखा पोलीसांनी केले आवाहन

पोलीस ठाणे सोनेगाव येथे सन २०२२ मध्ये अप क्र १२ / २०२२ कलम ४२०, ४०९, ४०६, ३४ भादवी R / w 3 MPID Act 1999, R / w Sec. 4,5 Prize chits and money circulation schemes » Banning) Act 1978 गुन्हा दाखल असुन त्याची सविस्तर हकीगत अशी कि, यातील अटक महीला आरोपी मोहम्मदी बेगम D/o शबीर पाशा जुनैदी उर्फ मोहम्मदी बेगम w/o मोहम्मद इरफान उद्दीन व पाहीजे आरोपी १) मोहम्मद हबीब मोहम्मद हनिफ २) मोहम्मद अब्बास मोहम्मद युसुफ ३) मोहम्मदी बेगम D/o शबीर पाशा जुनैदी उर्फ मोहम्मदी बेगम w/o मोहम्मद इरफान उद्दीन ४) ओमर अहमद शेख, ५) बुऱ्हान शेख, व इतर यांनी गुंतवणुकदार यांना फॉरेक्स ट्रेडींग नावाचे एका स्किममध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवुन त्यामध्ये गुंतवणुक केल्यावर गुंतवणूकदार यांना अल्प प्रमाणात परतावा देउन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर काही दिवसातच स्वतःचे नावाचे कॉर्बीट कॉईन मोबाईल अॅप तयार करून त्याचे प्रमोशन करणेकरीता नागपुर, पुणे, मुंबई, गोवा इ. शहरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करून त्यामध्ये गुंतवणुकदार यांनी कॉर्बीट कॉईन घेतल्यास सदर कॉर्बीट कॉईन ची सुरवातीला कीमत ५.२२ रू राहील व त्यानंतर सदर कॉईनची कींमत ५००/- रू ते ५०००/- रू पर्यंत जाण्याचे प्रलोभन दाखवुन फीर्यादी व इतर गुंतवणुकदार यांचेकडून एकुण ६,५८,३०,०००/- रू ( सहा कोटी अठ्ठावन्न लाख तीस हजार रूपये फक्त ) ची गुंतवणुक करून घेवुन त्यापैकी काही गुंतवणुक दार यांना गुंतवणुक केलेल्या रकमेपैकी फक्त १,८९,६०,०००/- रू चा परतावा देवुन उर्वरीत ४,६८,७०,००० /- रू ( चार कोटी अडुसष्ट लाख सत्तर हजार रूपये फक्त ) ची फसवणुक केली आहे. अशा तक्रारीवरून पो.स्टे. सोनेगाव येथे अप क्र १२ / २०२२ कलम ४२०, ४०९, ४०६, ३४ भादवी R / W 3 MPID Act 1999, R / w Sec. 4,5 Prize chits and money circulation schemes (Banning) Act 1978 अन्वये दिनांक २४/०१/२०२२ रोजी दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चालू आहे.

सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान अदयापपावेतो महीला आरोपी मोहम्मदी बेगम D/o शबीर पाशा जुनैदी उर्फ मोहम्मदी बेगम w/o मोहम्मद इरफान उद्दीन, वय ३८ वर्ष, राह प्लॉट नं ३२७, रींग रोड, गुलशन ए अराफात कॉलनी, जॅस्मीन स्कुल जवळ, जीबीएन गंज, कलबुर्गी (गुलबर्गा), राज्य कर्नाटक यांना अटक करण्यात आली असून पाहीजे आरोपी १) मोहम्मद हबीब मोहम्मद हनिफ २) मोहम्मद अब्बास मोहम्मद युसुफ ३) ओमर अहमद शेख, ४) बहान शेख, सर्व रा. कलबुर्गी कर्नाटक व इतर यांच्यावर लुक आउट सर्क्युलर (LOC) काढण्यात आली आहे.

फॉरेक्स ट्रेडींग (Korbit coin) या कंपनीचे संचालक आरोपी नामे १) मोहम्मद हबीब मोहम्मद हनिफ, २) मोहम्मद अब्बास मोहम्मद युसुफ ३) मोहम्मदी बेगम D/o शबीर पाशा जुनैदी उर्फ मोहम्मदी बेगम w/o मोहम्मद इरफान उद्दीन ४) ओमर अहमद शेख, ५) बुऱ्हान शेख, व इतर यांचेकडुन संबधीत आर्थिक फसवणुक झाली असल्यास मा. पोलीस उप आयुक्त, कार्यालय आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस भवन, पहीला माळा, सिव्हील लाईन, नागपूर शहर पोनि अमोल देशमुख आ.गु.शा. नागपुर शहर मो. नं ९९२३१०३१५२ यांचेकडे संपर्क करावा.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close