अप्पर वर्धा धरणा जवळ आढळला शीर नसलेला मृतदेह

मोर्शी / प्रतिनिधी
मोर्शी शहरात उघडकीस आलेल्या एका घटनेने शहरात खळबळ माजली होती. अप्पर वर्धा धरणा जवळ जोलवाडी रस्त्यावर एका 30 वर्षीय तरुणाचा शीर नसलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह दुर्गादास पांडुरंग नेहारे (रा.मायवाडी) याचा असल्याचे तपासा अंती समोर आले.
मोर्शीपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मायवाडी येथील दुर्गादास पांडुरंग नेहारे हा 6 जानेवारीपासून घरून बेपत्ता होता. याची फिर्याद मोर्शी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दुर्गादास हा जवळपास एक महिन्यापासून बेपत्ता असल्याने त्याच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश प्राप्त झाले नाही. 8 फेब्रुवारी रोजी आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जोलवाडी शिवारातील वनविभागाच्या जंगलात त्याचा मृतदेह शरीरापासून डोके व हात अलग अवस्थेत आढळून आले.
जंगलात काम करण्यासाठी गेलेल्या तीन मजूरांना हा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या खिशात त्यांना आधार कार्ड दिसून आले. त्यावरून त्याची ओळख पटली. त्यांनी लगेच या घटनेची माहिती आष्टी पोलिस स्टेशनला दिली.
मोर्शी पोलिसांचे पथक घटनास्थळी
मोर्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर, ठाणेदार नितीन देशमुख, स्कॉड पोलिस उपनिरीक्षक अमोल बुरुकुल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आष्टी पोलिसांनी पंचनामा करून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी केली आहे.
आईने केला दोन चिमुकल्यांचा खून
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता दौंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जन्मदात्याने आईनेच मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पाटससध्ये घडली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील मिंढे वस्ती आईनेच अडीच वर्षांच्या मुलीला आणि एक वर्षाच्या मुलाला गळा दाबून खून केला आहे. त्याचबरोबर पतीच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती दौंड पोलिसांनी दिली.