क्राइम

दहशतवाद विरोधी पथकाने गोंदियातून एकाला घेतले ताब्यात 

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया नेटवर्क

                    एटीएस (दहशतवाद विरोधी) पथकाच्या अटकेत असलेल्या दोन दहशतवाद्यां कडून एटीएस कसून चौकशी करीत आहे. या दहशतवाद्यांना गोंदिया येथील एका व्यक्तीने आश्रय दिल्याचे तपासात समोर आलल्याने एटीएस ने त्या इसमाला ताब्यात घेतले आहे. दहशतवाद्यांकडे मिळून आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्याच्या परिक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

 त्याअनुषंगाने एटीएसने गोंदिया येथून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याने या दोघा दहशतवाद्यांना आश्रय दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याला एटीएसचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी अधिकृत दुजोरा दिला नाही.

राज्यात विविध ठिकाणी एटीएसच्या पथकाने या गुन्ह्याच्या अनुषंगाने झाडाझडती सुरू केली आहे. त्याच चौकशीसाठी काहींना ताब्यात घेतले असल्याचीदेखील माहिती आहे. दरम्यान दाते यांनी बुधवारी दिवसभर एटीएसच्या कार्यालयात तळ ठोकला होता. त्यांनी शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्याकडून या दोघांबाबत केलेल्या तपासाची माहिती घेतली. सुरुवातील कोथरूड पोलिसांनी अटक केल्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.

नंतर दोन दहशतवाद्यांचा ताबा दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) घेतल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासातील प्रगतीचा आढावा एटीएस प्रमुख सदानंद दाते यांनी बुधवारी प्रत्यक्ष एटीएस कार्यालयाला भेट देऊन घेतला. या वेळी त्यांच्याकडून सर्व बाजूंनी गुन्ह्याचा तपास करत असल्याचे सांगण्यात आले. मोहंमद युनूस महंमद याकू साकी (वय 24) आणि मोहंमद इम-ान महंमद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) यांना अटक केली आहे. एका पेन ड्राईव्हमधून धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर एटीएस प्रमुख सदानंद दाते यांनी बुधवारी पुणे एटीएस कार्यालयात बैठक घेतली. या वेळी दाते यांनी पुणे पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. गुन्ह्याचा तपास सुरू असून, तपासात सर्व बाजू पडताळल्या जात आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close