सामाजिक

अन ती चक्क पतीचा मृतदेह घेऊन करत होती विमानात प्रवास

Spread the love

विमान प्रवासातील अनेक व्हिडीओ समोर येतात. काही घटना क्रू मेंबसर्ससोबत वादाचे असतात. सध्या फॉकलॅन्डमधून चिलीला जाणाऱ्या विमानातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा विमान प्रवासात मृ्त्यू झाला होता पण त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांना याची माहितीही नसल्याचे समोर आले आहे.

२४ फेब्रुवारी रोजी एक ब्रिटीश पर्यटक आपल्या पत्नीसह विमानात चढला होता. तो फॉकलंड बेटांवरून चिलीला जाणार होता. मात्र विमान चिलीमध्ये उतरताच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. हे विमान लँ़ होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या विमानातून सर्व प्रवासी १ तास ३५ मिनिटे मृतदेह घेऊन प्रवास करत होते. विमानातून खाली उतरल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजताच सर्व प्रवाशांना धक्का बसला.

५९ वर्षीय ब्रिटीश नागरिक आपल्या पत्नीसोबत फॉकलंड बेटांवर आला होता. येथून दोघांना चिलीतील पुंता अरेनास येथे विमानाने जायचे होते. मग तिथून सँटियागोला जायचे होते. शनिवारी पती-पत्नी दोघेही चिलीच्या LATAM विमानातून प्रवास करू लागले. दोघेही फ्लाइटमध्ये बसले. विमानाने उड्डाण घेतले. त्यावेळी त्यांची तब्येत ठीक होती. पण विमान पुंता अरेनासमध्ये उतरताच सर्वजण आपापल्या जागेवरून उठू लागले.

पण ब्रिटिश नागरिक आपल्या जागेवरून उठला नाही. पत्नीला वाटले की ते झोपले असतील. त्यामुळे त्यांनी पतीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्या महिलेला दिसले की तिच्या पतीचा श्वास थांबला आहे आणि त्याचे शरीर थंड झाले आहे. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. क्रू मेंबर्सही तिथे आले. त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. हे ऐकून विमानात बसलेले इतर प्रवासीही घाबरले. सर्वजण विमानातून उतरले आणि मृतदेहही खाली उतरवण्यात आला.

यावेळी विमानतळावर उपस्थित पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पुंता अरेनास येथील स्पेशलिस्ट युनिटचे उपायुक्त डिएगो डायझ यांच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीचा मृत्यू आरोग्याशी संबंधित कारणांमुळे झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. त्यांच्या पत्नीनेही याला दुजोरा दिला. पती खूप आजारी असल्याचे पत्नीने सांगितले.

विमानातील यापूर्वी अशाच घटना समोर आल्या होत्या. डिसेंबर २०२३ मध्ये टेनेरिफ ते ग्लासगो असा प्रवास करताना आजारी पडलेल्या एका ब्रिटिश महिलेचा विमानातच मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close