एक डीएनए चाचणी आणि 20 वर्षाचे वैवाहिक आयुष्याचा अंत

नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
विज्ञान शाप की वरदान हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. विज्ञानाने केलेल्या प्रगती मुळे आपण चंद्रावर पोहचलो आहे. पण कधीकधी हीच प्रगती आपल्या साठी घातक तजयु शकते याचा विचार कोणी केला नसेल. विज्ञानाची हीच प्रगती एका कपल साठी धोक्याची ठरली आहे.
असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं. केवळ डीएनए चाचणी करून त्याने आपलं स्थिर जीवन उद्ध्वस्त केलं. या टेस्टचा निकाल पाहिल्यानंतर आता त्याला त्याचं लग्न वाचवण्यासाठी काय करावं हे समजत नाहीये.
पती-पत्नीचं नातं असं असतं की ते विश्वासावर टिकून असतं. जोपर्यंत एकमेकांवर विश्वास आहे, तोपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू असतं. पण त्यात संशय येऊ लागला तर असं काहीतरी घडतं, ज्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होतं. एका व्यक्तीने सांगितलं, की त्याची 20 वर्षांची ओळख आणि 18 वर्षांचं लग्न एकाच झटक्यात उद्ध्वस्त झालं आणि तेही डीएनए रिपोर्टमुळे
त्या व्यक्तीने ऑनलाइन प्लॅटफॉर्म Reddit वर त्याच्या आयुष्याबद्दल काहीतरी सांगितलं, जे व्हायरल झालं. दोन मुलांचा बाप असलेल्या या व्यक्तीने सांगितलं की, त्याचं लग्न 18 वर्षांपूर्वी झालं आहे आणि तो आपल्या पत्नीला गेल्या 20 वर्षांपासून ओळखतो. त्यांनी एकत्र व्यवसाय सुरू केला आणि वर्षभरातच त्यांनी लग्न केलं. यानंतर भांडण झालं आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. मात्र, ही वेगळी बाब आहे की काही दिवसांतच ते पुन्हा एकत्र राहू लागले. दरम्यान, पत्नीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्याने त्यांचा संसारही पूर्ण झाला.
पुढे समस्या तेव्हा निर्माण झाली जेव्हा नवऱ्याने एक डीएनए टेस्ट करून घेतली. याच्या रिपोर्टनुसार, त्याने ज्या जुळ्यांना आपलं मानलं होतं, ती त्याची मुलं नव्हतीच. त्यांचा बायलॉजिकल पिता दुसरा कोणीतरी आहे. त्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याला धक्का बसला आहे. एवढंच नाही तर पतीला हा प्रकार कळल्याचं पत्नीला समजताच तिचंही भान हरपलं. मात्र, तिने आपली चूक मान्य केली आणि विभक्त झाल्यानंतर काही दिवसांतच ती गरोदर राहिल्याचे पतीला सांगितले.