अन् पोलिसांनी चक्क उंदराला केली अटक
नवी दिल्ली / नवप्रहारं मीडिया
आपल्या देशातील पोलिसांचा जगात दुसरा नंबर लागतो. पोलिसांनी मनावर घेतल तर ते आकाश – पाताळ एक करून गुन्हेगाराला शोधून आंताठे त्यांनी अनेकदा सिद्ध केलं आहे. पण काही वेळा हेच पोलीस असं काही करतात की त्यांचा जगात हसा होतो.असाच प्रकार मध्यप्रदेश च्या छिंदवाडा जिल्ह्यातील ऐका पोलीस स्टेशन मध्ये घडला आहे. येथे पोलिसांनी दारू चोरीच्या आरोपात उंदराला अटक केली आहे.
या अजब गजब घटनेबद्दल अधिक माहिती अशी की , पोलिसांनी ऐका अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करून त्याच्या कडून ६० दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. या जप्त बाटल्या मालखाण्यात ठेवण्यात येतात. आणि काही कालावधी नंतर त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात येतात. पण या ठाण्यातील माल खाण्यातील बाटल्या मधील दारू अचानक खाली झाली. त्यामुळे पोलिसांनी याची चौकशी केली असता त्यांनी ती दारू उंदरांनी फस्त केल्याचा निष्कर्ष लावला .
पोलिसांनी लावली क्लृप्ती ,उंदराला पकडले – पोलीस ठाण्याच्या माल खाण्यात ठेवलेल्या दारूच्या बाटलीतून दारू गायब होणे ही बाब पोलीस विभागासाठी लाजिरवाणी आणि पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर (?) आळ आणणारी होती. त्यामुळे जसे बरेच वेळा ‘ चोर सोडून सन्याश्याला फाशी दिल्या जाते तसे याही प्रकरणात झाले. ती दारू उंदरांनी फस्त केली असे गणित लावत पोलिसांनी आपली बेरीज वजाबाकी बरोबर केली.
एकट्या उंदराने केल्या ६० बाटल्या फस्त ?-
पोलिसांनी जप्त केलेल्या अवैध दारूच्या पेट्यांमधून या तहानलेल्या उंदराने 60 बाटल्या रिकाम्या केल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर उंदीर इकडे तिकडे मद्यधुंद अवस्थेत पडताना दिसला. या उंदराला पकडण्यासाठी पोलिसांना पिंजरा लावावा लागला. एका उंदराला दारूच्या 60 बाटल्या पिणं शक्य नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र सध्या हाच उंदीर पकडला गेला, त्यामुळे या उंदरावरच संपूर्ण ठपका ठेवण्यात आला आहे.
अशी परिस्थिती फक्त भारतातच आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. ब्रिटनमध्येही ड्रग्ज चोरणाऱ्या अशा प्राण्यांची कमी नाही. अलीकडेच ब्रिटनमध्ये एका रॅकूनने बिअर पिण्यासाठी अनेक घरांवर हल्ला केला. तो घरोघरी जाऊन दारू पिऊन पळून जायचा. आता भारतातील या प्रकरणी आणखी काय अपडेट्स समोर येतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे.