आदित्य ठाकरे सह ठाकरे गटाला आणखी एक धक्का ?

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल ठाकरे गटाला ‘ जय महाराष्ट्र ‘ करणार असल्याची चर्चा
मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क
राज्यात सरकारला घेऊन अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.तर दुसरीकडे शिंदे गटात इन्कमिंगसुरू असुन आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य राहुल कनाल हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा और आहेत. मुख्य म्हणजे ज्या दिवशी (1 जुलै ) रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मनपा वर मोर्चा काढला जाणार आहे. त्याच दिवशी ‘ वर्षा’ वर राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलल्या जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनालयांचा वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कनाल यांनी महिन्यापूर्वीच युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअॅप ग्रूप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राहुल कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा होती. पक्षातील अंतर्गत कुरघोडींना कंटाळून ते बाहेर पडल्याची चर्चा आहे.
दोन दिवसांपूर्वी राऊत कनाल यांनी सोशल मीडियावर ट्विटरवर नवीन सुरुवात करणार असल्याचे सूचक पोस्ट केली होती.शिंदे फडणवीस सरकारला शुक्रवारी(दि.३०) एक वर्ष पूर्ण होणार आहे. परंतू, एक दिवस बाकी असला तरी शिंदेंच्या गटामध्ये सध्या इन्कमिंग सुरू आहे. तर ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या आमदार असलेल्या मनिषा कायंदे यांनी शिदेे गटात प्रवेश केला होता. त्याला काही दिवस उलटत नाही तोच कनाल हे देखील शिंदे गटात जाणार आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी 18 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेने)त प्रवेश केला होता. यावेळी राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. 1 जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारा विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी आदित्य ठाकरे निकटवर्तीय व खंदे समर्थक असलेल्या राहुल कनाल हे शिंदे गटात प्रवेश करत असल्यानं ठाकरे गटाची गळती काही केल्या थांबायचं नाव घेत नसल्याचं समोर आलं आहे.