राज्य/देश

असे काय घडले की शिक्षिकेची सत्यता माहीत पडताच शिक्षण विभागाला दरदरून फुटला घाम 

Spread the love

बरेली (यूपी) / नवप्रहार डेस्क

                        उत्तर प्रदेश प्रशासनाला एका शिक्षिकेची सत्यता समजल्यावर त्यांना दरदरून घाम फुटला कारण जी शिक्षिका मागील 9 वर्षां पासून सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत होती ती पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे.  तिने बनावट कागदपत्राच्या आधारे सरकारी शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली होती.

तपासात जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा प्रशासन खडबडून जागं झाले. त्यांनी या शिक्षिकेला निलंबित करून तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. शिक्षण क्षेत्रात बनावट कागदपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवण्याचा हा प्रकार उघड होताच अनेकांनी नोकर भरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

शुमायाला खान असं प्राथमिक शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. तपासात तिने नोकरी मिळवण्यासाठी दिलेली कागदपत्रे बोगस असल्याचं उघड झालं. तिने अधिवास प्रमाणपत्र एसडीएम कार्यालायतून बनवले होते. त्याशिवाय इतर कागदपत्रेही बनावट होती. २०१५ साली शुमायाला खानची जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये अधिवास प्रमाणपत्र सर्वात महत्त्वाचे होते. परंतु तिने दिलेली सगळी कागदपत्रे बोगस असल्याचं उघड झाले.

तहसिलदारांनी केलेल्या तपास रिपोर्टात स्पष्टपणे लिहिले होते की, शुमयला खानने निवास प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चुकीच्या तथ्यांचा आधार घेतला. तिची खरी ओळख उघड झाल्यानंतर, हे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात आले. यानंतर जिल्हा शिक्षण विभागानेही तिच्यावर कारवाई सुरू केली. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने शुमायला खानकडून अनेक वेळा स्पष्टीकरण मागितले मात्र तिने सादर केलेली माहिती आणि कागदपत्रे तपासली गेली तेव्हा ती फसवी असल्याचे सिद्ध झाले.

शुमायाला खानने तिचे पाकिस्तानी नागरिकत्व लपवून आणि भारतीय रहिवासी असल्याचा खोटा दावा करून ही नोकरी मिळवली होती. शिक्षण विभागाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शुमायला खान या महिलेला सहाय्यक शिक्षिका पदावरून निलंबित केले. यानंतर नियुक्तीच्या तारखेपासून तिला पदावरून काढून टाकण्याचा आदेशही जारी करण्यात आला. जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, फतेहगंज पश्चिमच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी फतेहगंज पश्चिम पोलिस ठाण्यात शुमायलाविरुद्ध एफआयआर दाखल केला. तिच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता शुमायालाला अटक करण्याची तयारी करत आहेत.

पाकिस्तानी असल्याचं उघड

कोणत्याही सरकारी नोकरीसाठी महत्त्वाचा कागदपत्र असलेलं अधिवास प्रमाणपत्र शुमायलाने फसवणूक करून बनवलं होतं. रामपूर येथील तहसीलदार कार्यालयाने त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की हे प्रमाणपत्र केवळ चुकीचे नव्हते तर ते बनवण्यासाठी दिलेली कागदपत्रेही खोटी आढळली. ती भारतीय नागरिक आहे आणि रामपूरमध्ये राहते असा दावा महिलेने केला होता. परंतु तपासात ती प्रत्यक्षात पाकिस्तानी नागरिक होती आणि तिने दिलेली माहिती खोटी होती हे दिसून आले. शिक्षण विभागाने ही बाब गांभीर्याने घेतली. जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आणि शुमायालाला निलंबित करत तिची नियुक्ती रद्द केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close