अपघात

ट्रक आणि आयशर वाहनात समोरासमोर धडक ; तीन जागीच ठार 

Spread the love

बुलढाणा  / नवप्रहार मीडिया

बुलढाणा जीह्यातील हायवे क्र.६ वर असलेल्या तालासवाडा फाट्याजवळ ट्रक आणि आयशर वाहनात समोरासमोर झालेल्या धडकेत ३ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर जखमी झाला असून तो वाहनात अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी बचावकार्य वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त आहे. यामुळे घटनेचा विस्तृत तपशील मिळू शकला नाही प्राथमिक माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग ६ वरील तालासवाडा फाट्या जवळ ही भीषण दुर्घटना घडली. ट्रक क्र. एम पी १४ ३७८६ आणि आयशर वाहन क एम एच १९ 19 सिएक्स ०९७७ यांची समोरासमोर भरवेगात धडक होऊन अपघात झाला आहे.

यामध्ये ३ जण जागेवरच ठार झाले. १ इसम जखमी असून गाडीत अडकून आहे. त्यांना काढण्यात येत आहे.मार्गावर सध्या दुरुस्ती मुळे एकेरी वाहतूक सुरू असल्याने सदरचा अपघात घडल्याची चर्चा आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close