राजकिय

पवार यांना आणखी एक धक्का : शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश 

Spread the love

सातारा / नवप्रहार मीडिया

               राज्याच्या राजकारणात सुरू असलेली उलथापालथ अजून थांबली नसल्याचे विविध पक्षात एनकमिंग आणि आऊट गोइंग सुरू आहे. यावेळी अजित पवार नाही तर शिंदेंनी शरद पवार यांना धक्का दिला आहे.सातारा येथे अनेक लोकांनी शरद पवार यांना बायबाय करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, गावचा विकास होत नसल्यानं आपण शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया यावेळी येथील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी दिली. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यामुळे पक्षात आधीच उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे आता शिंदे यांनी देखील शरद पवार गटाला धक्का दिला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close