सामाजिक

जवान डिफेन्स & स्पोर्ट्स करिअर अकॅडमी चा वर्धापन दिन आणि शासकीय सेवेत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार

Spread the love
खा. अमर काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम 
यशस्वी मुलांच्या पालकांचाही सत्कार 
वर्धा / प्रतिनिधी
                  शहीद परिवारातील व आत्महत्याग्रस्त परिवारातील तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यां करिता वरदान ठरत असलेल्या जवान डिफेन्स & स्पोर्ट्स करिअर अकॅडमी च्या १० प्रशिक्षणार्थी ची विविध विभागात किवड झाली आहे. या अनुषंगाने या  संस्थेकडून यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार आणि अकॅडमी च्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 “वरदा वर्धन” येथील सभागृहामध्ये खासदार अमर काळे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक आंबेडकरवादी विचारवंत डॉ.सुभाष खंडारे, किसान अधिकार अभियान चे प्रवर्तक अविनाश काकडे व प्रमुख अतिथी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख यांच्या उपस्थितीत जवान डिफेन्स अँड स्पोर्टस करिअर अकॅडमी वर्धा चा ०४ था वर्धापन दिवस व संरक्षणदल,अर्धसैनिक बल, महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झालेल्या जवान प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारोह संपन्न झाला.
या प्रसंगी प्रज्वल गांडुळे व राजेश सोळंकी यांची आर्मी मध्ये,सुरज आदमाने यांची नागपूर महापालिकेमध्ये Fireman पदी, सुनित म्हैसकर यांची Army ऑडनस कॉप्स मध्ये,सुमेध खोब्रागडे व सेजल पोहनकर यांची Mumbai POLICE मध्ये,प्रगती थुटे ची FOREST GUARD पदी,दिनेश बागडे यांची BRO व कोशिंदर पाल,संदल मैघने यांची BSF मध्ये निवड झाल्याबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते त्यांचा व त्यांच्या पालकांचा शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी माजी सैनिक प्रवीण पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जवान प्रशिक्षण केंद्राच्या उपक्रमाची स्तुती केली व युवक युवतींना संरक्षण दलामध्ये ह्या माध्यमातून रोजगार मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी वनरक्षक पदी निवड झालेल्या प्रगती थुटे व मुंबई पोलीस मध्ये निवड झालेल्या सेजल पोहनकर नी त्या कशा यशस्वी झाल्या त्याचे अनुभव कथन केले.जवान डिफेन्स अँड स्पोर्ट्स करीअर अकॅडमीचे संचालक प्रवीण पेठे यांनी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यामागील उद्देश,वाटचाल व भविष्यातील नियोजन व शहीद परिवारातील व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांना व जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे सैन्य भरतीपूर्व लेखी व शारीरिक प्रशिक्षण घेऊ शकत नाही त्यांना निशुल्क प्रशिक्षण देण्यात येईल याची घोषणा केली.याप्रसंगी शारीरिक प्रशिक्षक आकाश मांदाडे यांनी पण विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. रचना थुल व आभार प्रदर्शन प्रा.हेमराज पवार व कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्रा.प्रवीण सराटे यांनी केले प्रशिक्षण केंद्राचे लोकेश मेश्राम, सुजल कुरवाडे,राज टेंभुर्णे,तेजस गायकवाड,पूजा गोसटकर,मुस्कान पठाण सह सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. जवान डिफेन्स & स्पोर्टस् करिअर अकॅडमी,वर्धा च्या माध्यमातून 10 जणांना मी संरक्षण दलामध्ये रोजगार देऊ शकलो याचे आम्हाला समाधान आहे.माझ्या ह्या सामाजिक उपक्रमात मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार.
मेहनतीचे फळ मिळाल्याचे समाधान – शहीद परिवारातील व आत्महत्याग्रस्त परिवारातील तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना निशुल्क सैन्यभरती पूर्व लेखी व शारीरिक प्रशिक्षण देण्याछा विडा संस्थेने उचलला आहे. १०  मुलांना मिळालेल्या यशामुळे केलेल्या कार्याचे समाधान तर आहेच . सोबतच या यशाने आत्मविश्वास वाढला असून आणखी जोमाने कार्य करण्याचे बळ मिळाले आहे.
                प्रवीण पेठे , माजी सैनिक
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close