डॉक्टर एम के पवार शैक्षणिक संकुल येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्याने वृक्षरोपण कार्यक्रम
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
स्थानिक जुना धामणगाव. लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त्याने डॉ. एम . के .पवार शैक्षणिक संकुलामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित कर्नल के.पी.सिंग, संस्थेचे सचिव शिवाजीराव पवार, प्रा. जया केने प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला उपप्राचार्य दीप्ती हांडे ,प्राचार्य सुशांत देवनाथ उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कडुलिंब, वड ,पिंपळ ,सप्तपर्णी अशा वृक्षांची लागवड जयंतीनिमित्ताने करण्यात आली संस्थेमध्ये उपस्थित पालकांच्या हस्ते व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वृक्ष माझा सखा यावर श्री हनुमंत ठाकरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवट झाडे लावा झाडे जगवा ,वृक्षवल्ली आम्हा सोयरे ,माणसा माणसा काम कर झाडावरती प्रेम कर .असे नारे देऊन करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला सर्व पालक विद्यार्थी व सर्व संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते