शवविच्छेदन गृहातच चालू होते सफाई कामगाराचे अश्लील चाळे
नोएडा /. विशेष प्रतिनिधी
शववीच्छेदन गृह ज्याचे नाव देखील काढले तरी अंगावर शहारे येतात. पण त्याच ठिकाणी अश्लील चाळे चालत होते. असे जर तुम्हाला म्हटले तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. नोएडा च्या सेक्टर 94 मध्ये असा किळसवाना प्रकार घडला आहे. या घटनेचा कोणीतरी व्हिडीओ बनवला आहे. आणि तो समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
नोएडा सेक्टर-९४ मध्ये असलेल्या पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये सफाई कामगार आणि एका महिलेचे अश्लिल कृत्य सुरु होते. या गैरव्यवहाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सीएमओने तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. सायंकाळपर्यंत पोलिसांनी याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना अटक केली होती. पोस्टमॉर्टम हाऊसच्या डीप फ्रीजर रूममध्ये कॉल गर्लसोबत एक सफाई कर्मचारी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्याचे उघड झाले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे शवागारात आणले जाणारे मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवलेल्या खोलीत सफाई कामगाराचा अश्लिल कृतीचा कोणीतरी व्हिडिओ बनवला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नोएडातील सेक्टर-39 पोलीस स्टेशन हद्दीतील सेक्टर-94 येथील पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये स्वच्छता कर्मचारी एका महिलेला बोलावून अश्लिल कृत्य करत होता. जे की त्या खोलीत मृतदेह ठेवले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे स्वच्छता कर्मचारी आपल्या रासलीला मध्ये व्यस्त असताना कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. 2 मिनिटे 21 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये डीप फ्रीजरमध्ये सफाई कर्मचारी एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एवढेच नाही तर पोस्टमॉर्टम हाऊसच्या आतील डॉक्टरांच्या खोलीबाहेरील शौचालयाचा वापरही महिलेने केला. सफाई कामगाराच्या या गैरकृत्यांमुळे शवविच्छेदन गृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आतापर्यंतच्या बातम्यांनुसार, सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिसलेली महिला बाहेरची आहे. कारण शवागारात कोणत्याही महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती नाही. पण ही घटना उघडकीस आल्यानंतर सगळ्यांना हादरवून सोडणारी गोष्ट म्हणजे पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये बाहेरच्या महिलेच्या प्रवेशाने हेही सिद्ध होते की, इथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही किंवा देव भरवशाचा नाही. शवागारातून कोण काय चोरणार असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पण इथे मुद्दा चोरीचा नाही, मुद्दा असा आहे की इथे येणारे मृतदेह सर्व प्रकारचे असतात. अपघातापासून खुनापर्यंतच्या घटनांमध्ये तपासासाठी आलेले मृतदेह येथे ठेवले जातात. अशा परिस्थितीत, कोणत्याही मृतदेहाशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केल्यास संबंधित प्रकरणावर परिणाम होऊ शकतो.
पोलिसांनी त्या सफाई कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. तसेच पोलीस या प्रकरणी एफआयआर लिहिण्याच्या तयारीत आहेत. पण ही बातमी समोर आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं ते म्हणजे या लोकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण शहरात एकच जागा मिळाली, ते ही शवविच्छेदनगृह.