क्राइम

स्पा च्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड

Spread the love

चार दिवसातील दुसरी कारवाई 

नागपूर  / विशेष प्रतिनिधी 

                  मागील चार दिवसात शहरात स्पा च्या नावावर चाललेल्या वेश्याव्यवसाया वर झालेल्या कारवाई नंतर संत्रा नगरीत वेश्याव्यवसायचे लोन पसरत असल्याचे समोर आले आहे. प्रताप नगर आता गोकुलपेठ सारख्या गजबजलेल्या मार्केट मध्ये सलून च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड केला आहे.  रोहित ऊर्फ बंटी विजय खेडकर (रा. पांढराबोडी) असे 33 वर्षीय अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

‘स्पा’च्या आड देहव्यापार

बंटीचे धरमपेठेत फॅमिली सलून आहे. सलूनच्या केबिनमध्ये तो स्पा देखील चालवत होता. तेथे स्पासाठी येणाऱ्या लोकांना तो इतर सेवा घेण्याचे आमिष दाखवत असून सलून आणि स्पाच्या नावाखाली तो वेश्याव्यवसाय करत होता. ही गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता नागपूर पोलिसांच्या झोन-2 चे उपायुक्त राहुल मदने यांनी त्यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान पोलिसांनी डमी ग्राहक सलूनमध्ये पाठविला. त्याने मुलीसाठी बंटीसोबत सौदा केला. डमी ग्राहकाकडून पैसे घेताच पोलिसांनी बंटीला पकडले. या कारवाईत पोलिसांनी 25 वर्षीय पीडित तरुणीची सुटका केली. पीडित मुलगी गरीब कुटुंबातील असून ती घर चालवण्यासाठी हे काम करते. कामाच्या शोधात असताना ती बंटीच्या जाळ्यात आली आणि वेश्याव्यवसायात अडकली. हे सलून गोकुळ पेठ मार्केटपासून जवळ असतानाही तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

चार दिवसांतील दुसरी कारवाई

अशाच प्रकारची एक कारवाई 16 जानेवारीला प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. ज्यामध्ये वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकून चार महिलांची सुटका करण्यात आली होती. नागपूरच्या खामला परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ‘अमजनेजा स्पा’च्या आड गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माहितीची शहानिशा केली आणि सापळा रचला. त्यामध्ये देखील एक डमी ग्राहक या स्पा सेंटर मध्ये पाठविण्यात आला.

तेथे सौदा झाला आणि डमी ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली. तेथे चार मुली-महिला आढळल्या पोलिसांनी स्पाचा व्यवस्थापक नीलेंद्र महेश उके (वय 34,राहणार वाडी) याच्यासह दोन महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा नोंदविला. या भागात अनेक दिवसांपासून देहव्यापाराचे काम सुरू होते. गरीब घरांतील मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करविला जात होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close