अंजनगावात ९ ऑगस्ट क्रांती दिनी मेरी माटी मेरा देश कार्यक्रम संपन्न
अंजनगाव सर्जी, मनोहर मुरकुटे
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील धार्मिक स्थळा वरील पवित्र माती गोळा करण्यात आली असून यामध्ये अंजनगाव शहरातील विठ्ठल मंदिर संस्थान, देवनाथ मठ, महादेव भावलिंग देवस्थान, संत गाडगे बाबांच्या पवित्र भूमितील मातीचे पूजन करण्यात आले असून संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान गत वर्षभरात राबविण्यात आले. मेरी माटी, मेरा देश अर्थात माझी माती, माझा देश’ या अभियानाचा समारोप अंजनगाव सुर्जी येथील जयस्तंभ चौक येथे बुधवार ९ ऑगस्ट २०२३ क्राती दिनी समारोप करण्यात आला, क्रांती दिनाचे औचित्य साधून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानाचा समारोप दर्यापूर अंजनगाव सुर्जी विधानसभा अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ ठिक-ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. दर्यापूर विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणच्या पवित्र जागेवरील माती दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी येथे संकलित करण्यात आली. दरम्यान संकलित करण्यात आलेल्या मातीमध्ये श्री संत रुपलाल महाराज मठामधील माती व गाडगेबाबा यांच्या पवित्र भूमीतील माती तिचे पूजन दिल्ली येथे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते पूजन होणार आहे
याप्रसंगी कार्यक्रमाला माजी आमदार रमेशजी बुंदीले, माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोले,अभियान प्रमुख गोपालजी चंदन डॉ कविटकर, पद्माकर
सांगोळे, मनीष मैन, रोशन कट्यारमल, तालुकाध्यक्ष मदन पाटील बायस्कार ((दर्यापूर ग्रामीण), तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दाळू महाराज , मनोहर मुरकुटे, सुभाष थोरात, राजेंद्र रेखाते संदीप राठी संतोष काळे, , सौ. शुभांगीताई पाटणकर, सौ सुनिता मुरकुटे, सौ शिलाताई सगणे, सौ. हेमलता लेंधे सौ. कुसुमताई बेलसरे, सौ.विद्याताई घडेकर, , रितेश खंडकर, मनोहर भावे, सुनील बेराड , शंकर येऊल, संजय नाठे, गणेश पिंगे, नितीन दातिर, विनोद दुर्गे, सुधीर रेखाते,विकास रावले, जुनघरे,दीपक दाभाडे, गोविंद भावे, दिनेश आवंडकर, महेंद्र धुळे, हरिश्चंद्र गायगोले,माकोडे, हर्षल पायघन , रितेश अवंडकर, गौरव चांदुरकर, यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला
पवित्र कलशाचे पूजन हे भारताच्या सीमेवर ज्यांनी देश सेवा केली असे माजी सैनिक शिवरतन जैस्वाल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच पंचप्राण शपथ घेऊन भारत मातेसाठी जे सैनिक शहीद झाले त्यांना नमन करून दर्यापूर विधानसभा क्षेत्रातील पवित्र मातीचे कलश दिल्लीकडे संयोजक गोपाल चंदन ह्यांचे हस्ते दिल्ली कडे रवाना करण्यात आले.