क्राइम

महिलेचा अल्पवयीन मुलावर जडला जीव ; नवऱ्या सोबत तसे करतांना तिला आली नाही जराही कीव

Spread the love

लातूर / नवप्रहार मीडिया 

                          डिगोळ देशमुख ता रेणापूर येथील ३४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतकाच्या शरीरावर असलेल्या जखमा पाहून पोलिसांना ती हत्या असल्याचा अंदाज आला होता. पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता मृतकाच्या पत्नीने आपल्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

वैभव ज्योतिराम निकम (३४, रा. डिगोळ देशमुख, ता. रेणापूर) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, वैभव ज्योतिराम निकम हा टेम्पोचालक होता. तो पत्नी नेहा व एक मुलगा, मुलीसह राहत होता. दरम्यान, २ जानेवारीपासून तो बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. त्यामुळे भाऊ सुरज ज्योतिराम निकम यांनी शुक्रवारी रेणापूर पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती.

शनिवारी शिवारातील श्रीराम पवार यांच्या शेतालगतच्या बराशित वैभव निकम यांचा मृतदेह आढळून आला. पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे, जमादार एस. व्ही. शेंबाळे, व्ही. एस. मागडगे यांनी पंचनामा केला. दरम्यान, घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. अंत्यविधीनंतर मयताचा भाऊ सुरज यांनी भावजयीस तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत पाहिले होते. त्यामुळे अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने त्या दोघांनी भावाचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी रक्ताने माखलेली गोधडी घराच्या पाठीमागे जाळून टाकली, अशा आशयाची फिर्याद रेणापूर पोलिसांत दिली. त्यावरुन विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

पत्नीने दिली खूनाची कबुली…
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मयताची पत्नी नेहा वैभव निकम हिच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा मी व अल्पवयीन प्रियकराने मिळून पतीचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी मयताची पत्नी आरोपी नेहा व तिच्या अल्पवयीन प्रियकरास ताब्यात घेतले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close