अंजनगावसुर्जी बसस्थानकात पाण्याचा वानवा
चार दिवसापासून बोअरवेल बंद
स्वच्छ्ता गृह बंद असल्याने प्रवाशांचे हाल
अंजनगावसुर्जी, मनोहर मुरकुटे
बत्तीस वर्षानंतर येथील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरु आहे दर्यापूर आगारा अंतर्गत येथील बस स्थानकाचे व्यवस्थापन चालते परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे गेल्या चार दिवसांपासून येथे प्रवाशांच्या सोई सुविधांचे हाल होत असल्याचे चित्र दिसत असून पाण्याची व्यवस्था असलेल्या बोअर वेल मधील मशीन नादुरुस्त झाल्याने पाणी बंद पडले असून पिण्याचे पाणी तर नाहीच त्याशिवाय स्वच्छ्ता गृह पाणी नसल्याने बंद पडले आहे त्यामुळे स्थानकात पाण्याचा वणवा निर्माण झाला असून प्रवाशांचे हाल होत आहेत
********** अंजनगाव बसस्थानकात प्रशासनाच्या वतीने सातत्याने दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप प्रवाशांचा असून कधी भंगार गाड्यांचा वापर होत असल्याने गाड्या रस्त्यात ब्रेकडाऊन होण्याचे प्रकार घडत आहेत शिवाय प्रवाशांच्या सुविधेकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष दिल्या जात नसून गेल्या चार दिवसांपासून बस स्थानकाचे बोअर वेल मशीन जाळली असल्याने बंद पडले असून पुरुष व महिलांचे स्वच्छ्तागृहाला पाण्याअभावी बंद करावे लागले आहे त्यामुळे प्रवाश्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे यात महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत असल्याचे दिसत आहे एकीकडे बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू असून याच बोअरवेलच्या पाण्याचा वापर बांधकामात होत आहे मोटर बंद पडली तेव्हा कंत्राटदाराने या बोअरवेल मध्ये आपल्या कामापुरत्या पाण्याची छोटी मोटर या बोअरवेल मध्ये टाकून आपल्याला लगण्यापुरत्या पाण्याची व्यवस्था केली मात्र स्वच्छ्ता गृहांच्या टाक्यात पाणी जाईल अशी व्यवस्था मात्र केली नाही तेव्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने कारवाई न करता थेट स्वच्छ्ता गृहांना कुलूप ठोकले पिण्याचे पाणी व स्वच्छता गृहाला लागणारे पाणी ही अती आवश्यक सोय असताना प्रशासनाने याबाबत तातडीने कारवाई करावी अशी प्रवाष्यांकडून मागणी होत आहे
बोअरवेल मधील मशीन जळाल्याने ती दुरुस्तीसाठी बाहेर काढताना पाईप तुटून खाली गाळात पडली त्यामुळे आता ती बाहेर काढून दुरुस्त करण्याचे मी सबंधित कंत्राटदाराला सांगितले आहे आता पुन्हा त्याला सांगून तातडीने काम करायला लावतो
* अभिष बहुळकर
आगार व्यवस्थापक दर्यापूर