आध्यात्मिक

अंजनगावसुर्जीत भगवान जीव्हेश्वर जन्मोत्सवाला सुरुवात

Spread the love

अंजनगावसुर्जी (मनोहर मुरकुटे)

अंजनगाव सुर्जी येथील स्वकुळ साळी आणि विणकर समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव २९ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे येथील काठीपुरा स्थित जिव्हेश्वर मंदिर संस्थान यांच्या विद्यमाने जन्मोत्सव दरवर्षी साजरा केला जातो या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव उपस्थित असतात या कार्यक्रमांमध्ये यावर्षी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्याम मधुकर ठनगण (वारकरी संपदायाचे प्रचारक तथा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे गाढे अभ्यासक) हे आहेत तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ सुचिता आनंदराव पाटेकर (शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला) तसेच अविनाश वसंत इंगळे अकोला (साहित्यिक व विवाह समुपदेशक) मनीष काशिनाथ मेन अंजनगाव सुर्जी (जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तसेच अध्यक्ष विणकर बहुत उद्देशीय संस्था अंजनगाव सुर्जी )तसेच कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती प्राध्यापिका डॉ अंशुमती राजेंद्र कहाणे व प्राध्यापिका डॉ वैशाली विनायक भोपाळे (पाटणकर) याना आचार्य पदवी मिळाल्या बद्दल यांचा सत्कार घेण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमांमध्ये परमपूज्य आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांचे आशिर्वाचन ३० ऑगस्ट दुपारी ४ वाजता होणार आहे २९ ऑगस्ट ला दुपारी चार वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव संस्थांनतर्फे करण्यात येणार आहे तसेच २४ ऑगस्ट ला दुर्गा सप्तशती पाठ सकाळी १० ते २ शुक्रवार २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट पर्यंत तीन दिवसीय सकाळी नऊ वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण होणार आहे तसेच शनिवार दिनांक २६ ऑगस्ट सकाळी ११ वाजता आयुष्यमान भारत व ई श्रम कार्ड काढून देणार आहेत याचा जास्तीत जास्त समाज बांधवांनी लाभ घ्यावा रविवार दिनांक २७ ऑगस्ट रविवार श्रीनाथ सखा वृंद प्रार्थना सकाळी सहा वाजता देवनाथ पीठ अंजनी ग्राम प्रार्थना होणार आहे रविवारी ता २७ ला येथील धमाले पॅथॉलॉजी कडून रक्त तपासणी शिबिर घेऊन अल्प दरात नागरिकांना आपल्या रक्ताची तपासणी करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे शिवाय पुढील पाच दिवसात सुद्धा धमाले पॅथॉलॉजी मध्ये स्वस्त जरा टेस्ट करता येणार आहे तसेच रात्री आठ वाजता संगीत संध्यामध्ये सुप्रसिद्ध गायक प्रमोद ढगे आणि सुजल निमजे , राजेश गुरू यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम होणार आहे सोमवारी ता. २८ ला दुपारी तीन वाजता शिवलीलामृत अकरावा अध्यायवाचन तसेच दुपारी चार वाजता शिवमहिम्न विश्व मांगल्य सभा महिलावर्ग आणि २९ ऑगस्टला भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव तसेच साळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थी व जेष्ठाचा सत्कार सोहळा होणार आहे बुधवार दिनांक ३० ऑगस्ट ला सकाळी आठ वाजता श्रीच्या पालखीची शोभायात्रा अंजनगाव नगरीतून निघणार आहे तसेच काल्याचे किर्तन झाल्यानंतर दुपारी २ वाजता महाप्रसाद आहे गुरुवारी ३१ ऑगस्ट दुपारी दोन वाजता गुरु भजनी मंडळ महिला मंडळ सुर्जी अंजनगाव यांच्या सुरेल आवाजात भजनाचा कार्यक्रम आहे दुपारी चार वाजता परमपूज्य मठाधिपती श्री जितेंद्रनाथ महाराज देवनाथ पीठ अंजनी ग्राम यांचे आशीर्वचन आणि ५ वाजता खिरापत आहे अशा प्रकारे भगवान जिव्हेश्वर मंदिर संस्थान द्वारे अनेक विविध कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व समाज बांधवांनी या विणकर बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जिव्हेश्वर मंदिर संस्थांनच्या विश्वस्तांकडून करण्यात आले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close