अंजनगाव तालुक्यात दुष्काळचे संकट
शेतकऱ्यांनी कर्ज काडून केली पेरणी
७५ टक्के पिकांचे सध्या स्थितीत झाले नुकसान
अंजनगाव सुरजी मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुका हा आधीच गेली पाच सहा वर्षांपासून दुष्काळग्रस्त स्थितीत कायम असताना या वर्षी सुद्धा ह्या दोन्ही तालुक्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे
गेली एक महिन्यापासून या भागात पाऊस नाही तरीही कोणी एक शब्द बोलायला तयार नाहीत. आता कोठे जाऊन बसले आहेत राजकीय हुशारक्या मारणारे नेते मंडळी? ग्रामीण भागातील पिकांची वास्तविकता कधी समजून घेतील?? शेतकऱ्यांसाठी ही नेते मंडळी निर्दयी का झाले असावेत. हा प्रश्न सध्या स्थितीत निर्माण झाला आहे
जून महिन्याच्या 25 तारखेपर्यंत पाऊस आला नाही. मधल्या 20 ते 22 दिवस पाऊस हा थोडाफार अल्प प्रमाणात झाला, त्यानंतर 20 जुलै पासून पाऊस गायब झाला आहे. जवळजवळ 25 ते 30 दिवसांपासून पाऊसाचा खंड पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास काढून घेतल्याची अवस्था सध्या स्थिती झाली आहे. यामध्ये आजच्या घडीला 75 टक्के पिकाचे नुकसान हे झालेले आहे
पिकांंसाठी आवश्यक लागणारा ओलावा जमिनीत शिल्लक नाही. 10 ते 15 इंच इतका खोलवर ओलावा गेला असल्याने पिके अर्धे करपलेली तर बाकीचे करपण्याच्या मार्गावर आहेत.
सद्यस्थितीत कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास ७५ टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा झाली आहेत. काळ्या जमिनीतील थोडीशी तग धरून असलेली पिके दिसतात, पण पुरेशा ओलाव्या अभावी ते देखील काही दिवसांमध्ये करपून जातील असे वाटते. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का नाही हे सांगणे आता कठीण झाले आहे
ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात विदर्भ च्या काही तालुक्यात पाऊसाने हजेरी लावली. पण अंजनगाव तालुक्यात पाऊसाचे प्रमाण कमी होते . आता सर्व भरोसा हा परतीच्या पाऊसावर आहे. तो पाऊस पडला तर रब्बी हंगाम. टिकेल नाहीतर यावर्षी शेतकऱ्याची झोळी ही रिकामी राहणार हे नक्की !!
राजकीय निगर गट्ट नेतृत्वाने तर पावसाचे आणि शेतीच्या प्रश्नांच्या संदर्भातील देणे-घेणे सोडून दिले आहे. राजकीय नेते हे
दुष्काळ कधी पडतोय याची वाट पाहत आहेत का ? असा असा प्रश्न सध्या स्थितीत निर्माण झाला आहे
यावर्षीला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रचंड ऊन तापल्यामुळे, वातावरणात प्रचंड धग निर्माण झाली. परिणामी सोयाबीन, मूग, उडीद, धने इत्यादी पिकांना फुलांचा पहिला बहर आलेला पूर्ण गळून गेला. फुले गळून पडल्यामुळे उत्पादन घटणार आहे हे नक्की.
****************************
** अल निनोचा सर्वाधिक फटका ऑगस्ट महिन्याला **
इंग्लंड येथील युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक सायन्समध्ये हवामान शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार अल निनोचा सर्वाधिक फटका भारताला जूननंतर ऑगस्ट महिन्यात बसला असून, तो गत १२३ वर्षातला नीचांक आहे. जूनमध्ये १२२ वर्षांतला नीचांकी पाऊस बरसला.
*****************************
* मान्सूनचा आस बदलला * देवरस : यांच्या संशोधनानुसार, भारतात
मान्सूनचा आस (ट्रफ) सतत मध्य भारतावर असतो, पण यंदा तो सतत उत्तर भारतावर राहिला आहे. कोअर मान्सून झोन यंदा मध्य भारताकडून उत्तरेकडे सरकल्याने हा मोठा बदल यंदाच्या मान्सूनचे वैशिष्ट्य आहे. मान्सून जुलैमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर होतो. तेव्हा देशभर मुसळधार व एकसारखा पाऊस पडतो. पण यंदा ही स्थिती खूप उशिरा तयार झाली. मान्सून ७ ते १८ ऑगस्टदरम्यान हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर झाला. मान्सून पुन्हा २१ ऑगस्टपासून उत्तरेकडे स्थिर झाला. कमी दाबाची प्रणाली आता निघून गेल्याने, मान्सून पुन्हा ब्रेकिंग अवस्थेत आहे, असेही देवरस यांनी आपल्या संशोधनात स्पष्ट केले.