अंजनगाव सुर्जीत ५ सप्टेंबरला महाआरोग्य भव्य रोग निदान शिबिर
अण्णाभाऊ साठे मा. बहुउद्देशीय संस्था व दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन
अंजनगाव सुर्जी ,मनोहर मुरकुटे
अंजनगावसुर्जी येथे अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था व दत्ता मेघे उच्च शिक्षण संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य महाआरोग्य रोग निदान शिबिराचे आयोजन दिनांक ५ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत प्रभा मंगलम् अंजनगाव सुर्जी येथे करण्यात आले आहे.
२०२१मध्ये ऑगस्ट महिन्यात संस्थेने महाआरोग्य रोग निदान शिबिर आयोजित केले होते तेव्हा २३५० ते २८०० रुग्णांची तपासणी करण्यात आली होती सोबतच ५८० रुग्णांची शस्त्रक्रिया करून या रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला होता.
याच स्वरूपाचे भव्य आयोजन यावर्षी करण्यात आलेले आहे.
या शिबिराला उद्घाटक म्हणून मा. श्री सौरभजी कटियार जिल्हाधिकारी अमरावती तर अध्यक्ष म्हणून मा. श्री दिलीपजी सोंदळे जिल्हा शल्यचिकित्सक तसेच प्रमुख पाहुणे म् मनोजजी लोणारकर उपविभागीय अधिकारी दर्यापुर व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अंजनगाव सुर्जीच्या जनतेला वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल अंजनगाव मधील ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
या शिबिरामध्ये रक्तदाब, ब्लड शुगर, ब्लडप्रेशर,किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, डोळ्याचे आजार, मोतीयाबिंदू, तिरळेपणा, हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्याचे आजार, मुतखड्याचे आजार, पोटाचे आजार, थायरॉईड, स्त्रियांचे विविध आजार, लहान मुलांचे आजार, फ्रॅक्चर तसेच हाडांचे आजार, त्वचेची विविध आजार, नाक- कान- घशाचे आजार, तसेच इतर विविध आजार रोगाचे तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून योग्य ती उपचार पद्धती द्वारे विनामूल्य सेवा प्रदान करण्यात येईल तरी सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आव्हान अण्णाभाऊ साठे मा.बहुद्देशीय संस्था व चळवळ रुग्ण समितीचे अक्षय गवळी,अमोल पुकळे, चेतन सारंदे यांनी केले आहे.या शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांचे आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रिया सुद्धा करण्यात येणार आहे हे शिबिर भव्य आरोग्य शिबिर असल्याचे आयोजकांनी सांगितल. शिबिराच्या यशस्वी करिता अक्षय गवळी,अमोल पुकळे, चेतन सारंदे,संतोष देशमुख आकाश फाटे, प्रतीक आंबेकर,शेखर लोणकर, अंकित सारंदे, अंकुश होटे अभिनव पिसोळे,संकेत बेलसरे, अक्षय वानखळे, सागर दातीर,हेमंत पांढरे सुशांत देशमुख,वृषभ गुहे,आदित्य देशमुख, प्रशांत देशमुख, पवन आंबेकर, धीरज गवळी आधी सर्व मित्र परिवार प्रचंड मेहनत घेत आहे.