शेती विषयक

अंजनगाव सुर्जी तालुका कृषी कार्यालयात ४३ पैकी १९ पदे रिक्त,

Spread the love

प्रभारांच्या खांद्यावर आहे इतरांचे ओझे

अंजनगाव सुर्जी, मनोहर
मुरकुटे

शेतकऱ्यांना शेतीसंबंधी विविध योजना तालुका कृषी कार्यालयांतून दिल्या जातात.एक खिडकी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती सांगितली जाते.परंतु अंजनगाव सुर्जी तालुका कृषी कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून या कार्यालयात कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहचणे कठीण झाले आहे
अंजनगाव सुर्जी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मात्र रिक्त पदांचा दुष्काळ पडला आहे. एकूण ४३ पदांपैकी तालुका कृषी अधिकाऱ्यांसह एकूण १९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा अतिरिक्त प्रभार सांभाळताना प्रभारींची चांगलीच दमछाक होत आहे.
कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्ये मुळे शेतकऱ्यांची कामे कशी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
येथील तालुका कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, अनुरेखक, वाहनचालक, शिपाई, चौकीदार अशा ४३ पदांचा आकृ़तिबंध मंजूर आहे. यामध्ये तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. कृषी अधिकारी संवर्गाचे पद रिक्त आहे. कृषी मंडळ अधिकाऱ्याची एक पद रिक्त असल्याने मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाला कुणी वालीच नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय कृषी पर्यवेक्षकांच्या चार पदांपैकी एक पद रिक्त आहेत. कृषी सहायकांची २४ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी १५ पदे भरलेली आहेत, तर ९ पदे अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे अनेक कृषी सहायकांकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे अनेक गावे अतिरिक्त असल्यामुळे काम करताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वरिष्ठ लिपिकाचेही एक पद असुन ते सुद्धा रिक्त आहे.
तर शिपाई चौकीदाराचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे.
तालुका कृषी कार्यालयात ४३ पदांपैकी १९ पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम कामावर होत आहे. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहाेचण्यास अडचणी येत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे योजनांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close