अंजनगाव सुर्जी शहरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अंबानगर, यश नगर मध्ये घाणीचे साम्राज्य
न प चे प्रशासक झोपेत तर आरोग्य विभाग कोमात
अंजनगाव सुर्जी , (मनोहर मुरकुटे)
आधीच शहरात सर्वत्र तापाची साथ सुरू असताना, शहरात नगरपरिषदेकडून नागरिकांचे आरोग्याचे दृष्टीकोनातून कोणतीही उपाय योजना आखली गेली नाही,तर शहरात सध्या स्थितीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे, शहरातील नागरिकांचे घरासमोरील नाली तील घाण ही पंधरा,पंधरा दिवस काढल्या जात नाही अश्या परिस्थितीत नाली मधील रोगराईचे जंतू, डांस, हे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत अशी परिस्थिती सध्या स्थितीत अंजनगाव शहरात निर्माण झाली आहे
ह्यामध्ये सध्या स्थितीत यश नगर येथील गोपाल अस्वार ह्यांचे घरासमोरील नाली चे घाण पाणी ,हे गेली पंधरा दिवसापासून नाली साफ न केल्यामुळे घाणीचे पाणी त्यांचे घरात शिरले असून ह्याबाबत त्यानी न प चे आरोग्य विभागाकडे स्वतः जाऊन तक्रार दिली परंतु कोणताही उपयोग झाला नाही, शेवटी मोठ्या त्रासाने न प कडून रात्री ला येऊन केवळ थातुरमातुर काम करून कर्मचारी निघून गेले परंतु परिस्थिती जैसे थे निर्माण झाली आहे, तर अंबानगर मध्ये सुद्धा तीच परिस्थिती कायम आहे
ह्यावरून सध्या स्थितीत अंजनगाव न प चा आरोग्य विभाग हा हा जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसून येत आहे
माझ्याकडे सध्या स्थितीत दोन चार्ज असून, अंजनगाव न प मध्ये आरोग्य निरीक्षक पदावरील कर्मचारी हजर असल्यामुळे त्यांनी ह्या सर्व समस्यांचे निराकरण त्यांनी करायला पाहिजे परंतु काय अडचण आहे हे माझ्या लक्षात येत नाही तरी सुद्धा सादर बाबीबाबत मी योग्य उपाय योजना त्वरित करतो असे आरोग्य निरीक्षक प्रतीक वाटाणे ह्यांनी सांगितले
मी गेली आठ दिवसापासून न प च्या आरोग्य विभागात माझ्या घरासमोरील घाण, दुर्गंधीयुक्त पाणी काढण्यासाठी चकरा मारत आहो परंतु न प चे आरोग्य निरीक्षक सुरज हातेकर ह्यांनी माझ्या कामाची कोणतीही दखल घेतली नाही,परिणामी मला ह्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे असे नागरिक गोपाल अस्वार ह्यांनी सांगितले