सामाजिक
अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त ठाणेदार यांचा पोलीस स्टेशन येथे सत्कार
नवप्रहार
प्रतिनिधी – अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी – नुकत्याच गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन ला ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी पदभार स्वीकारला असून नवनियुक्त ठाणेदार सुरेश म्हस्के यांचा दिनांक २७ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजता अखील भारतीय पत्रकार संघटनेच्या वतीने शाळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी अखील भारतीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुधाकर टिपरे, सुनिल माकोडे, कैलाश वाकपांजर, महेश वाकपांजर, प्रेमदास तायडे, सचिन इंगळे, मनोज मेळे, सुशील बहिरे, पंकज हिरुळकर, अनिल गौर, रहेमानभाई, उसरे भाऊ, निलेश पाटील, आदी पत्रकार उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1