गुढीपाडव्याच्या दिवशीच अंजनगाव तालुक्यासह जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांवर आसमानी संकट
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका बघायला मिळतोय. तर दुसरीकडे अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पार झाला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली
अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे काही सुसाटयाच्या वाऱ्यासह पाऊस पडला आहे. अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळालाय. पण शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे.अवकाळी पावसामुळे, उन्हाळी पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकरडा महसूल मंडळातील,डोबांळा,शेडगाव, भागात यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे , ज्वारी, कांदा , गहू , आंबा यासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला रब्बी हंगामातील गहू, ज्वारी ,तसेच हरभरा, कांदा आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
कोकरडा महसूल मंडळामार्फत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानाचे प्राथमिक सर्वेक्षण करुन वरिष्ठांना पंचनामे पाठवण्यात येईल
राजेश मिरगे
महसूल मंडल अधिकारी
अंजनगाव सुर्जी
माझ्या शेतातील ज्वारीचे पीक पुढील आठवड्यात काढणीला येत होते मात्र अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी
प्रफुल्ल बारब्दे
शेतकरी कोकर्डा