क्राइम

अंगावर शहारे आणणारी घटना !   खून करून मृतदेहाचे केले 400 तुकडे 

Spread the love

 15 प्लॅस्टिक च्या बॅग मध्ये तुकडे भरून नाल्यात फेकले 

ग्वाल्हेर / नवप्रहार मीडिया 

                       ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथून ऐक अंगावर शहारे आणणारे प्रकरण उजेडात आले आहे.  प्रकरण मागे घेण्यासाठी उद्भवलेल्या पैश्याच्या वादातून पिता पुत्राने मिळून इसमाची हत्या केली आहे. त्याच्या मृतदेहाचे 400 तुकडे करून आणि ते 15 प्लॅस्टिक क्या पिशवीत भरून नाल्यात फेकून देण्यात आले होते. डिएनए रिपोर्ट आल्यावर पोलिसांनी कारवाईला गती देत पिता- पुत्राला अटक केली आहे. 

ग्वाल्हेरमधील जनकगंज पोलिस स्टेशन हद्दीतील रामकुई गेंदावली रोडवर असलेल्या स्वर्ण रेखा नाल्यात 28 सप्टेंबरला एका व्यक्तीचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडला होता. तसंच विच्छेदन केलेलं धडही या नाल्यात सापडले होते. तपासादरम्यान हा मृतदेह त्याच शहरातील बहोदपूर झाडू मोहल्ला येथील रहिवासी राजू खानचा असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून तपास सुरू केला होता. राजू खानच्या कुटुंबीयांनी तस्कर कल्लू खान आणि मुलगा नाझिम यांच्यावर हत्येचा आरोप केला होता.

वडील न्यायालयात हजर, मुलाला आग्र्यातून अटक : दोन्ही आरोपींना याची माहिती मिळताच ते पसार झाले. यानंतर पोलिसांनी सातत्यानं कारवाई करून दोघांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, पोलिसांपासून वाचण्यासाठी वडील कल्लू खान हे अंमली पदार्थांच्या व्यसनप्रकरणी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी कारागृहात झाली असताना मुलगा अद्याप पोलिसांच्या ताब्यात आला नव्हता. यानंतर काही दिवसांनी कल्लू खानचा मुलगा नाझिम याला आग्रा इथून अटक करण्यात आली. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.

डंबेलनं वार करुन हत्या : चौकशीदरम्यान आरोपी पिता-पुत्रांनी सांगितलं की, कल्लू खान आणि नाझिमचं राजूसोबत भांडण झालं होतं. वाद इतका वाढला होता की तो पोलिसांपर्यंत पोहोचला होता. याच प्रकरणात 21 सप्टेंबर रोजी कल्लू खान यानं राजूला तक्रार मागं घेण्यासाठी घरी बोलावलं. तिथे राजूनं त्याबदल्यात 20 हजार रुपये मागितले. त्यानंतर पैसे देण्याचं सांगून राजूसह दोघंही सत्यनारायण यांच्या घरी पोहोचले. पैशाच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर खोलीत ठेवलेल्या डंबेलनं राजूच्या डोक्यात वार करून खून केला. दोन्ही आरोपींनी राजूच्या डोक्यात सुमारे दोन ते तीन वार केले. त्यामुळं त्याचा मृत्यू झाला.

मृतदेहाचे 400 तुकडे : आरोपींनी राजूच्या मृतदेहाचे 400 तुकडे केले. त्यानंतर ते 15 थैल्यात भरुन स्वर्ण रेखा नाल्यात फेकले. पोलिसांनी कल्लू खानच्या घरातून गुन्ह्यात वापरलेला डंबेलही जप्त केलाय. कल्लूलाही वेगळ्या रिमांडवर घेण्यात येणार असून नाझीमच्या जबाबाची पडताळणी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. कल्लूच्या गुन्हेगारी रेकॉर्डचाही उल्लेख करण्यात आलाय. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, एका प्रकरणात तो स्वत: तुरुंगात होता. मुलाच्या अटकेनंतर हा प्रकार उघडकीस आलाय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
1
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close