राजकिय

आणखी एका पुतण्याकडून बंडाचा झेंडा  ;  भुजबळांकडून दादांना धक्का

Spread the love

समीर भुजबळ यांचा राजीनामा 

बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय 

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                     मुंबई चे  राष्ट्रवादी (AP) गटाचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. समीर भुजबळ हे छगन भुजबळांचे पुतणे आहेत. त्यामुळे आणखी एका पुतण्याने बंडाचा झेंडा फडकावल्याची चर्चा आहे.

 

 

समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

समीर भुजबळ हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. नांदगाव विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, ही महायुतीमधये ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला सुटली. एकनाथ शिंदे यांनी येथून सुहास कांदेंना उमेदवारी दिली.

त्यानंतर समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश न करता समीर भुजबळ यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुतीमध्ये सुहास कांदे यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सोपी जाईल, अशी चर्चा होती. मात्र, समीर भुजबळ यांनी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी खासदार भुजबळ यांच्या उमेदवारीने या मतदारसंघातील सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता चुरशीची झाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close