हटके

….. अन त्यांनी नवरदेवासह घोड्याला देखील उचलून धरले

Spread the love

                   सोशल मीडियावर नेहमीच कुठले न कुठले व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका लग्नाच्या वरातीतील  व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नावरदेवाचे मित्र लग्नाला युनिक बनविण्यासाठी काही न काही नवीन करीत असतात. मागे एका मित्राच्या लग्नात दुसरा मित्र बुरखा परिधान करून आला होता. आणि नवरदेवाला त्याने त्याच वेशात सरळ जाऊन मिठी मारली होती.तेव्हा तो व्हिडीओ खूप चर्चेत होता.आता लग्नातील असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे.

स्टाग्रामवर ravirajsinh_rajput_0007 या अकाउंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चारपायीवर घोड्यासह नवरदेवाला उचलून मित्रमंडळी गोल-गोल फिरवत आहेत. नवरदेव बिचारा घाबरून घोडीला घट्ट पकडून बसलेला दिसत आहे.

कारण घोडी बिथरली असती तर नवरदेवासह सर्वांचीच पंचाईत झाली असती आणि मजा म्हणून केलेला हा स्टंट जीवघेणा देखील ठरला असता.
या व्हिडीओत घोडी बिथरून जाऊ नये म्हणून तिला सांभाळणारा देखील त्या खाटे सदृश्य चारपायीवर उभा असलेला दिसत आहे. या क्लिपला पाहून युजर आश्चर्यचकीत झालेले दिसत आहेत. या क्लिप पाहून युजर त्यांना वेडे म्हणत आहेत.

या क्लिपला 8 लाखाहून अधिक जणांनी पाहीले आहे. 1 लाख 39 हजार जणांनी लाइक्स केले आहे. एका युजरने म्हटले आहे की आता हेच पाहायचे राहीले होते. तर एका युजरने म्हटलंय यांच्यातील एक तरी अर्धा शहाणा असायला हवा होता. तर एक युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की नशीब घोडी बिथरली नाही अन्यथा या चारपायीवरुनच जखमींना दवाखान्यात न्यावे लागले असते. तर एकाने म्हटले घोडीने जरा जरी हुशारी दाखवली असती तर हा व्हिडीओ कॉमेडी व्हिडीओ बनला असता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close