वसंतवाडी येथे हत्या करून अपहरण प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

राजेश सोनुने / पुसद
तालुका प्रतिनिधी
खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वसंतवाडी येथे ऊस तोडीचे पैशांच्या देवाण घेवाणी वरून महिलेची हत्या करून तिच्या पतीचे अपहरण केले होते. हत्या करून अपहरण करणाऱ्या आरोपीचा छडा लावण्याला आहे. प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश मिळविले.अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी यवतमाळच्या पोलीस मुख्यालयात अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.सत्कारामुळे पोलीस खात्यात स्थानिक पोलीस शाखेचे आता कौतुक केले जात आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र अमरावतीचे जयंत नाईक नवरे, यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या हस्ते स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ उपविभाग पुसद,उमरखेड येथील सपोनि अमोल सांगळे,पो उपनि सागर भारस्कर पो.हवा सुभाष जाधव पो.नाईक सोहेल मिर्झा, कुणाल मुंडोकार,पंकज पातुरकर,पो शिपाई ताज मोहम्मद,सुनील पंडागळे,चालक दिगंबर गित्ते यांना खंडाळा खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतवाडी येथे ऊस तोडीचे पैशाचा देवाण घेवाण वरून महिलेची धारदार शस्त्राने सपासप वार करून अपहरण करण्यात आली होती.आरोपींनी सांगली येथील महिलेचा खुन करून तिचे पती ला गाडीत टाकुन घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन तीन आरोपी वाहनास ताब्यात घेतले.मृतक महिलेच्या पतीला सुद्धा त्यांच्या तावडीतून ताब्यातून सोडवले होते.अश्या कामगिरी बद्दल दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस मुख्यालयात प्रशस्ती पत्र देण्यात आले आहे.