हटके

अन त्या वाळू डेपो चालकाला गुंतवकदारांनी धुतले ; गुन्हे शाखेत घेतली शरण 

Spread the love
आर्थिक व्यवहार या मागे कारण असल्याची चर्चा 
धामणगाव रेल्वे/ प्रतिनिधी 
                मंगरुळ (जळगाव ) वाळू डेपो चालक गजानन भेंडे याला अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलेच धुतल्याची चर्चा आहे. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे बोलल्या जात आहे. तर जीव वाचवण्यासाठी गाजू भेंडे याने स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात शरण घेतल्याचे समजत आहे.
                            गजानन भेंडे याने जळगाव ( मंगरूळ ) ता .धमाणगाब रेल्वे येथील डेपो आणि गोकुलसरा घाटव  तिवसा तालुक्यातील चांदुर ढोरे येथील रेती घाट घेतला आहे. यासाठी त्याने अनेक लोकांकडून पैशे घेऊन त्यांना घाटात भागीदार बनवल्याची  भागीदारांत चर्चा आहे. पण अध्याप याने कोणालाच एक दमडीही फेकून मारली नसल्याने भागीदारांत जबरदस्त असंतोष पसरला आहे.
          या असंतोषाचा उद्रेक काल दि. 8 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पाहायला मिळाला.अमरावती येथील गुंतवणूक दारांना भेंडे अमरावतीत आल्याची खबर मिळताच सगळे त्या ठिकाणी जमा झाले. आणि त्यांनी गजू भेंडे कडे आपल्या पैशाची मागणी केली.
नेहमी तेच ते उत्तर ऐकून संतापलेल्या गुंतवणूकदारांनी दिला चोप – यापैकी एकाने आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगीतले की गजु भेंडे याने घाटात भागीदार बनवण्याच्या नावावर अनेक लोकांकडून रक्कम घेतली आहे. पण डेपो सुरू होऊन तीन महिन्यांच्या कालावधी होऊन देखील अध्याप त्याने कोनालाही दमडीही फेकून मारली नाही. त्यामुळे मंगरूळ दस्तगिर सह जीह्यातील अनेक लोक त्याच्यावर संतांपलेले आहेत. आणि आता त्यांच्या संयमाचा बांध फुटल्याने ही घटना घडली.
एलसीबी कार्यालयात शरण घेतल्याची चर्चा – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुंतवणूकदारांकडून याची धुलाई सुरू असताना आता वाचण्याचा कुठलाच मार्ग नाही हे लक्षात येताच याने एलसीबी कार्यालयाकडे धाव घेतल्याचे समजते. ( क्रमशः )
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close