अनंत राऊतांच्या काव्यसरी हिवरखेड मध्ये बरसणार.
रसिक मित्र मंडळाच्या वतीने काव्य मैफिलीचे आयोजन.
रितेश टीलावत
तेल्हारा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची काव्य मैफिल “श्रावणधाराचे” आयोजन हिवरखेड येथील रसिक मित्र मंडळाने केले आहे. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, भोंगा वाजलाय -नेता गाजलाय, तुले चोरून पाहीन मी अशा एकापेक्षा एक दर्जेदार कवितांनी काव्य रसिकांना भुरळ पाडणारे प्रख्यात कवी अनंत राऊत यांची काव्य मैफिल “श्रावणधारा” रविवार दि. 11 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी ठीक 6.30 वा. विठ्ठल मंदिर संस्थान सभागृह हिवरखेड येथे आयोजित करण्यात आली आहे. हसवता हसवता अंतर्मुख करणारे व डोळ्यातून टचकन पाणी काढणारे कवी अनंत राऊत युवा वर्गामध्ये विशेषतः कॉलेज तरुण तरुणीमध्ये प्रचंड लोकप्रिय असून हसवत हसवत लोकांना खिळवून ठेवणारी त्यांची अफलातून शैली श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेते. सणासुदीच्या पवित्र अशा श्रावण महिन्यात रसिक मित्र मंडळ हिवरखेडने काव्य रसिकासाठी या खास मेजवानीचे आयोजन केले आहे. तरी सर्व काव्य रसिक मंडळीने सहपरिवार या काव्य पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन रसिक मित्र मंडळीतर्फे रमेश दुतोंडे, श्यामशिल भोपळे, किरण सेदानी, राजु खान, सुनिल इंगळे, गजानन बंड, अनिल कराळे, संदिप इंगळे, गणेश वानखडे, विरेंद्र येऊल, नसिम सौदागर, चंद्रप्रकाश राऊत, महेंद्र भोपळे, श्रीकृष्ण भड, प्रा. संतोष राऊत, मनोज राठी, मनिष भुडके, पंकज देशमुख, विलास घुंगड, डॉ. प्रशांत इंगळे, दिलीप बाळापुरे, राजेश टाले, अरुण निमकर्डे, संजय शेंडे, उमेश तिडके, शामसुंदर शर्मा, प्रा. विनोद टेंभरे, सतिष इंगळे, विजय खिरोडकार, कामिलअली मिरसाहेब, राहुल गिऱ्हे, संजय हिवराळे, अभिजीत ढोकणे, सलमान खान, धनंजय गावंडे, दानिश खान, मनिष गोरद, महेंद्र कराळे यांनी केले आहे.