सामाजिक

आनंदाचा शिधा वाटपाला हिंगणगाव येथे सरपंचाच्या हातून सुरवात 

Spread the love
धामणगाव रेल्वे/ प्रतिनिधी
                 सणासुदीच्या दिवसाचा आनंद गरिबांना  सुद्धा घेता यावा यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील हिंगणगाव कासारखेड येथे सुद्धा सरपंच दुर्गाबाक्षसिंह ठाकूर त्यांच्या हस्ते शिधा वाटप करण्यात आला.
  ग्रामीण भागातील सर्वच गोदामातून आनंदाचा शिधा रेशन दुकानात पोहोचला आहे. त्यामुळे यंदा वेळेपूर्वीच लाभार्थ्यांच्या घरात आनंदाचा शिधा पोहोचेल.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा, चनाडाळ, साखव व एक लीटर या परिमाणात खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेले शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा’ गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सदर आनंदाचा शिधा एक ते ३० सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येईल. पात्र शिधापत्रिकाधारकाला ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरण करण्यात येईल.

याबाबतचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबत शासनादेश जारी केला. त्यानुसार जिल्ह्यातील तीन लाख २७ हजार ६० रेशनकार्डधारक आनंदाच्या शिधासाठी पात्र ठरले आहेत. याबाबतची नोंद पुरवठा विभागाने शासनाकडे आधीच केली होती. दरम्यान आता पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा पोहोचला आहे. त्याचे वाटपही लवकरच होणार आहे.यंदा वेळेआधीच वाटपराज्य शासनाने गत वर्षी दिवाळीला पहिल्यांदा आनंदाचा शिधाचे वाटप केले होते. .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close