आनंद महिंद्रा यांनी त्या टेक्नॉलॉजि चे कौतुक करत ; दर्शवली मोठी तयारी
देशात टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनविली असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोकं एखाद्या वस्तूत किंवा मशीन मध्ये आणखी काहीतरी बदल करून अशी काही नवीन मशीन फायर करतो की त्याचे सगळ्याच स्तरावरून कौतुक होते. उद्योजक आनंद महिंद्रा नेहमीच नवीन काही बनवणाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल करून त्याचे कौतुक करतात. नुकतेच त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत तशी मशीन बनविण्यासाठी गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे.
सध्याच्या वेळेला देशभर प्रत्येक क्षेत्रात टेक्नोलॉजीमध्ये अनेक सुधारणा होताना आपल्याला दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ,ज्यात नदीच्या स्वच्छेतेसाठी टेक्नोलॉजीचा उत्तम वापर करण्यात आला आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडिया सक्रिय असतात. ते रोज काही न काही नवीन पोस्ट शेअर करत असतात. एखादा सामाजिक विषय असेल किंवा चित्रपटाचे कौतुक अशा सर्वच आशयांच्या पोस्ट शेअर ते करत असतात. नुकताच आनंद महिंद्रानी एक व्हिडिओ त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्म एक्स अकांउटवर पोस्ट केला आहे. यात त्यांनी एका नवीन टेक्नोलॉजीचे कौतूक केले आहे. याच व्हिडिओला शेअर करत आनंद महिंद्राची पोस्ट शेअर केलीय
या व्हिडिओत आपल्याला एक नदीचा परिसर दिसत आहे. या नदीत पिवळ्या रंगाची मशीन आहे, ज्या मशीनच्या साहाय्याने नदीतील सर्व कचरा वेगळा होऊन मशीनमध्ये ओढला जातोय. मशीनचा आकार जास्त मोठा नसून उत्तम पद्धतीने सर्व कचरा गोळा करत आहे.
‘नद्या स्वच्छ करण्यासाठी स्वायत्त रोबोट. असून ते चिनचे असल्याचे वाटत आहे?आपल्याला हे इथेच बनवायचे आहे…आत्ताच…जर कोणतेही स्टार्टअप असे करत असतील तर…मी गुंतवणूक करण्यास तयार आहे…’असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे.
या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,’आनंद सर हे खरे शार्क आहेत जे शार्क टँकमध्ये नाहीत’ तर आणखी एका यूजरने लिहिलेय’फक्त महिंद्रा भारतात बनवू शकते. कृपया करा सर’ तसेच व्हिडिओला लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत.