शैक्षणिक

श्रीराम महाविद्यालयात ‘ लोया डे ‘ साजरा

Spread the love

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 

श्रीराम शिक्षण संस्था संचालित स्वर्गीय नंदलाल लोया कन्या विद्यालय व श्रीराम कनिष्ठ महिला महाविद्यालय येथे “लोया डे” साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव घनश्याम मेश्राम प्रमुख अतिथी मुकुंदराव पवार शाळेच्या समन्वयक जया केने मॅडम संस्थेचे संचालक गोपाल भूत, किशोर साकुरे, सुभाष देशमुख उपस्थित होते मंचावर सौ.राधा गोपाल भूत मान्यवरांसह स्वर्गीय नंदलाल लोया कन्या विद्यालय व श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.अर्चना राऊत, मुकुंदराव पवार च्या मुख्याध्यापिका दीप्ती हांडे, राधेश व गौरी लोया प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना ने करण्यात आली नंदलाल लोया डे निमित्ताने मातीची भांडी तयार करणे व्यंजन कबड्डी रस्सीखेच क्रॉस बॉल व्यंजन पुष्पगुच्छ तसेच टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करणे स्पर्धांचे आयोजन केले होते  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अर्चना राऊत यांनी केले याप्रसंगी शाळेच्या प्रांगणात आयोजित उपरोक्त कार्यक्रमामध्ये सर्व स्पर्धक विद्यार्थिनींना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले दरवर्षी आयोजित उपरोक्त कार्यक्रमांमध्ये लोया आणि भूत परिवाराची उपस्थिती असते सदर परिवार विद्यार्थिनींवर पालक म्हणून सहकार्य करतो हे येथे उल्लेखनीय या कार्यक्रमाच्या माध्यमाने सेवानिवृत्त कर्मचारी गणेश पेंढारकर यांचे सुद्धा स्वागत व सत्कार करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी करिता ज्योती भूत, संजय बाळापुरे,अनिरुद्ध घुलक्षे,सुनिता ठाकूर, राजेश बानाइत, निशिकांत वासनिक, माला जगताप,सुनीता ठाकूर ,योगेश गायगोले,संजय जाधव ,वृंदा जोशी,मंगला दुधाट,रवींद्र भोंगे,किशोर दारोकार, किशोर पांडव, गणेश उईके यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन योगेश गायगोले व आभार मंगला दुधाट यांनी  मानले*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close