धर्मांध युवकाकडून महिलेचे लैंगिक शोषण ; अश्लील व्हिडीओ बनवला

धर्मांतरण करण्यासाठी दबाब , महिलेची पोलिसात धाव
लखनऊ / नवप्रहार मीडिया
हिंदू महिला किंवा तरुणींशी सोशल मीडियावर चुकीचे नाव सांगून मैत्री करायची .त्यानंतर त्यांच्याशी जवळीक वाढवून त्यांना आपल्या प्रेमात ओढायचे. त्यानंतर सोबत सहमतीने अथवा जबरदस्तीने शरीरिक संबंध बनवायचे. त्याचे अश्लील व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिचे सतत लैंगिक शोषण करण्यासोबत तिच्यावर धर्मांतरणासाठी दबाब टाकायचा हा प्रकार मागील काही काळापासून कट्टरपंथीयांकडून सुरू आहे. अभियंता असलेल्या धर्मांध युवकाने एका हिंदू महिलेवर बलात्कार करून अश्लील व्हिडीओ बनवत तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाब टाकत होता. या धर्मांध युवकाचा अत्याचार सहन न झाल्याने शेवटी महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. आरोपी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,अब्दुल अलीम जाफरी २०२० मध्ये फेसबुकच्या माध्यमातून लखनऊमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या संपर्कात आला. अब्दुलने आपले नाव निहाल सांगितले. एके दिवशी अब्दुलने महिलेला भेटायला बोलावले आणि तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी अब्दुलने महिलेचा अश्लिल व्हिडिओही बनवला. त्यानंतरही तो तिचे शोषण करत राहिला.
काही दिवसांनंतर अब्दुल या महिलेवर इस्लाम धर्म स्वीकारून लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, अब्दुल तिला भेटवस्तू देऊन आमिष दाखवत असे आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगत असे. मात्र, पीडित मुलगी यासाठी तयार नव्हती. पीडितेने हे मान्य न केल्यावर अब्दुलने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. तसेच महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.
अब्दुलने इस्लाम धर्म स्वीकारून तिच्याशी लग्न न केल्यास त्याचा खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेचे म्हणणे आहे की, अब्दुल जेव्हाही लखनऊला यायचा तेव्हा तो तिला मशिद आणि मदरशात नेऊन नमाज अदा करायला लावण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्या छळाला कंटाळून महिलेने आपले राहण्याचे ठिकाण बदलले, परंतु अब्दुलने तिला सोडले नाही.
अब्दुलने गाझीपूरमध्ये महिलेचे नवीन घर शोधून काढले आणि तेथेही महिलेचा छळ सुरूच ठेवला. आणि धमक्या देणे सुरूच ठेवले. अखेर वैतागलेल्या महिलेने अब्दुलविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला नोएडा येथून अटक केली आहे.आरोपी अब्दुल हा लखनऊच्या मादियानव पोलीस स्टेशन परिसरातील शिवानी नगरचा रहिवासी असून तो नोएडा येथे राहणाऱ्या एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. तर, पीडित महिला लखनऊच्या गुडंबा पोलीस स्टेशन परिसरात राहते. एका रिपोर्ट्सनुसार, महिलेचा पती गुजरातमध्ये राहतो आणि काम करतो. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.