अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई ; 92हजाराचा मुद्देमाल जप्त
आर्वी :- निखिल वानखडे
पोलिसांना गुप्तदाराकडून माहिती मिळाली कि,सावळापूर येथे राहणारा प्रकाश मेश्राम हा त्याच्या दुचाकी ने अवैधरित्या दारू वाहतूक करत वर्धा रोडने सावळापूर येथे येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने SDPO आर्वी पथकाने वर्धा रोड पांझरी नाल्याजवळ नाकेबंदी करून त्यास ताब्यात घेतले वरून नाव विचारले असता 1) प्रकाश एकनाथ मेश्राम वय 60वर्ष रा.सावळापूर ता. आर्वी जि. वर्धा त्यांच्या ताब्यातील दुचाकी किंमत 60,000/- व गावठी दारू किंमत 32,000 रुपयाची असा एकूण 92,000/- रुपये चा माल मिळून आल्या सदरचा माल जप्त करून आरोपीवर पो.स्टे.आर्वी येथे दारू बंदी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नरूल हसन,अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे,उपविभागीय पोलीस अधिकारी डी.सी खंडेराव यांचे मार्गदर्शनात सदरची कारवाई उप विभागीय आर्वी पथकातील पोलीस अंमलदार सतीश जांभुळकर, सुरज मेंढे,आत्माराम भोयर, गणेश खेडकर यांनी केली.