राजकिय

फोडाफोडीच्या राजकारणाला पवार यांनीच सुरवात केली. 

Spread the love

कल्याण / नवप्रहार डेस्क 

                   निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीचे राजकारण ही काही नाविन बाब नाही राज्यात तर सकाळी कोणी ज्या पक्षात आहे संध्याकाळी तो त्या पक्षात राहणार किंवा नाही याचा ही भरोसा नसतो. अश्या स्थितीत राजकीय मंडळी पक्ष फोडल्याचा एकमेकांवर आरोप करीत आहेत.यावर राज ठाकरे यांनी भाष्य करतांना फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वप्रथम शरद पवार यांनी सुरवात केल्याची खरमरीत टीका केली आहे. मला फोडाफोडीचे राजकारण कधीही मान्य नाही आणि ते होणारही नाही. आता जे बोलतात आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला त्यांनी एकमेकांकडे पाहावे. असे ही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी मनसेचे नगरसेवक फोडले. तर राज्यात सर्वात आधी फोडाफोडीचे राजकारण कुणी केले असेल तर ते म्हणजे शरद पवारांनी. काँग्रेस फोडून त्यांनी राज्यात पुलोदचे सरकार स्थापन केले, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी Raj Thackeray केला.

कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ कळवा येथे राज ठाकरेंची सभा झाली. यात त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा जाहीरपणे समाचार घेतला. ते म्हणाले उद्धव ठाकरेंनी मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक खोके देऊन फोडले. तेव्हा त्यांना काही नाही वाटले. त्यांच्यासोबत शरद पवार बसले आहेत. या फोडाफोडीच्या राजकारणाची कुणी सुरुवात केली असेल तर शरद पवारांनी Sharad Pawar. त्यानंतर त्यांनी पुलोद स्थापन केले.

 

 

ठाकरेंसोबत असलेल्या पवारांनी 1991 मध्ये पुन्हा छगन भुजबळांना Chhagan Bhujbal फितवले आणि बाळासाहेबांची शिवसेना फोडली. त्यानंतर नारायण राणेंना बरोबर घेत काँग्रेसने पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. त्यावेळी आजचे फोडाफोडीच्या राजकारणावर टाहो फोडणारे नेतृत्व कुठे दिसत नव्हते, असा टोलाही राज ठाकरेंनी पवार आणि ठाकरेंना लगावला.

राज्यात दोन वर्षांपूर्वी शिवसेना फुटली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सरकार स्थापन झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला. यावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राज्यभर रान पेटवले आहे. याकडे लक्ष वेधत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी कसे फोडाफोडीचे राजकारण केले, याची यादीच दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close