Uncategorized

प्रेमाची अशी शिक्षा की संपूर्ण गाव हादरलं

Spread the love

मुलाच्या आईला मारहाण करून केले निर्वस्त्र 

बेळगाव (कर्नाटक) / नवप्रहार मीडिया 

                   बेळगाव (कर्नाटक) जिल्ह्यातून एक लाजिरवाणी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उजेडात आली आहे. मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर हल्ला करून साहित्याची तोडफोड केली आहे. ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी मुलाच्या आईला मारहाण करून तिच्या अंगावरील कपडे फाडून तिला निर्वस्त्र केले आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मुलगी घरातून पळून गेल्याची घटना घरच्यांना समजली, त्यानंतर घरातील लोकांना हे ही समजलं की, ती आपल्या बॉयफ्रेंडबरोबर पळून गेली आहे. आपली मुलगी एका मुलाबरोबर पळून गेल्याचे समजल्याबरोबर मुलीच्या घरातील लोकांनी मुलाच्या घरावर हल्ला केला. पहिल्यांदा घरातील लोकांना मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्यांच्या घराच्याही साहित्याची तोडफोड करण्यात आली. मुलीच्या घरची लोकं एवढ्यावरच थांबली नाहीत, तर त्यांनी मुलगी पळून गेल्याचा राग मुलाच्या आईवरही काढला. त्यांनी मुलाच्या आईला घरातून बाहेर ओढत आणून महिलेचे कापडे फाडून तिला नग्न केले गेले. या घटनेमुळे बेळगावसह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मुलाच्या आईवर मुलीच्या नातेवाईकांनी क्रूरतेच्या आणि निर्लज्जतेची सगळ्या परिसीमा गाठली आहे. महिलेच्या मुलाचे काही दिवसांपासून त्या मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. मुलगा आणि मुलगी दोघंही एकाच जातीतील असली तरीही मुलीच्या कुटुंबाने मुलाच्या घरावर जोरदार हल्ला करून माणुसकीला काळीमा फासला आहे.!

या घटनेची महिती देताना पोलिसांनी सांगितले की, त्यांची मुलगी पळून गेल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाला मिळताच मुलीचे घरचे सगळे मुलाच्या घरी पोहचले. त्यानंतर आधी त्यांनी घराबाहेर शिवीगाळ करून गोंधळ घातला. ते फक्त शिवीगाळ करून थांबले नाहीत, तर मुलाच्या आईला बाहेर फरपटत बाहेर ओढत रस्त्यावर आणले. त्यावेळी मुलाच्या आईला अश्लिल शिवीगाळ करून तिचे कपडे फाडून तिला निर्वस्त्र करण्यात आले. त्यानंतर तिला एका खांबाला बांधून मारहाणही करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेची त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. त्यानंतर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ज्या ज्या लोकांनी महिलेला आणि त्यांच्या घरावर हल्ला केला होता, त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. तर आता पोलीस मुलाचा आणि मुलीचा शोध घेत आहेत.

ही घटना घडल्यानंतर कर्नाटक राज्यातही जोरदार खळबळ उडाली आहे. त्यामुळे या घटनेची दखल गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनीही घेतली आहे. त्यांनी थेट पीडित महिलेची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी केली आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांबर कडक कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत. या प्रकरणी आता पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close