हटके

अन बिबट्या ने थेट पोलीस ठाण्यातुन कुत्र्याला नेले पळवून 

Spread the love

हाराष्ट्रातील रत्नागिरीतून एक बिबट्या पोलीस ठाण्यात घुसून कुत्र्याला पळवून नेत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ही संपूर्ण घटना पोलीस ठाण्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिबट्या पोलीस ठाण्यात घुसतो आणि कुत्र्याची शिकार करून त्याला पळवून नेतो, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे.  ही घटना बुधवारी (24 जानेवारी) रात्री रत्नागिरीतील राजापूर पोलीस ठाण्यात घडली. पोलीस ठाण्याच्या आत कुत्रे भटकत होते. कुत्र्यांचा पाठलाग करताना बिबट्या आवारात घुसल्याचं व्हिडिओत दिसतंय.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सुदैवाने बिबट्या पोलीस ठाण्यात घुसल्याचं लक्षात आल्याने पोलीस ठाण्यातील  सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेकडे धाव घेतली. बिबट्याने कुत्र्याला पोलिस ठाण्याच्या आत पकडले. त्यानंतर अंगणाच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीच्या दिशेने, जिथे एक विहीर होती. त्या दिशेने बिबट्या निघून गेला. ही संपूर्ण घटना  पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलीस ठाण्यात कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

पोलीस ठाण्याच्या आत सुमारे चार ते पाच कुत्रे होते. बिबट्याला पाहून ते सर्व घाबरले. काही पोलीस ठाण्याच्या बाहेर पळाले तर एक कुत्रा खोलीत शिरला. याच खोलीत बिबट्याही घुसला. व्हिडिओत इतर कुत्रे पळून गेल्याचे दिसून येतंय.

व्हिडिओमध्ये एका कुत्र्याच्या मानेला धरून बिबट्या पोलीस स्टेशनमधून बाहेर निघताना दिसत आहे. बिबट्याने पोलीस ठाण्यातील एकाही कर्मचाऱ्यावर हल्ला केला नाही आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात चांगलीच घबराट पसरली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close