क्राइम

प्रेमात दुखावलेल्या प्रेयसी कडून प्रियकराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न 

Spread the love

आग्रा / नवप्रहार वृत्तसेवा

 
            प्रेम आणि युद्धात सगळ काही  चालते असे म्हटल्या जाते. म्हणजेच प्रेम आणि युद्ध जिंकण्यासाठी सत्य असत्य कशाचाही वापर करणे काही गैर नाही असा त्याचा अर्थ निघतो. पण प्रेमात अपयश आलेली लोकं कुठल्याही स्तराला जाऊ शकतात अस अनेक घटनेत पाहायला मिळते. पण आग्र्यात प्रेमात अपयश आलेल्या तरुणीने जे केले आहे ते पाहून तुम्हालाही वाटेल की तरुणी ही असे ही करू शकते. या प्रकरणाची स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशी आहे. कदाचित जी जाणून घेण्याची तुमची उत्कंठा वाढली असेल तर त्याला जास्त न ताणता आम्ही आपणाला या बद्दल सांगतो.

आग्रा परिसरातल्या शमशाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठेरई गावात ही घटना घडली.  गावातील इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या मुलीच्या अंगावर झेरॉक्सच्या दुकानात गेली असता ॲसिड फेकण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरु केला. सदर अकरावीत शिकणारी मुलगी तिच्या राधा नावाच्या मैत्रिणीबरोबर झेरॉक्सच्या या दुकानात गेली होती. त्यावेळी पाठीमागून तिच्यावर ॲसिड फेकण्यात आले. पोलिसांनी राधाची कसून चौकशी केली तेव्हा या प्रकरणातलं सत्य समोर आलं. राधाला आपला प्रियकर धर्मेंद्र याला या प्रकरणात अडकवायचं होतं आणि म्हणून तिने स्वतःच आपल्या मैत्रिणीवर ॲसिड फेकलं होतं.
चौकशीनंतर सत्य समोर
पोलिसांनी केलेल्या कडक चौकशीनंतर या प्रकरणातलं सत्य समोर आलं आहे. राधा या मुलीला धर्मेंद्रशी लग्न करायचं होतं. त्याने लग्नाला नकार दिल्यामुळे ती दुखावली होती आणि त्याला धडा शिकवण्यासाठी काही ना काही कट रचत होती. या कटाचा भाग म्हणून राधाने आपल्या एका मैत्रिणीला झेरॉक्सच्या या दुकानात बरोबर नेलं आणि पाठीमागून स्वतःच तिच्या अंगावर ॲसिड फेकलं. या घटनेचं खापर तिने धर्मेंद्रवर फोडलं. लक्ष्मीकांत नावाच्या गावातल्याच एका तरुणाकडून तिने ॲसिड विकत घेतल्याचं चौकशीत कबूल केलं. लक्ष्मीकांत तिला ॲसिड देत नव्हता. त्यावेळी त्वचेवर पडलेल्या डागांवर इलाज करण्यासाठी ॲसिड हवं आहे असं तिने लक्ष्मीकांतला सांगितलं. पोलिसांनी राधा आणि लक्ष्मीकांत या दोघांनाही अटक केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close