बछड्याला सोडवण्याचे तिचे प्रयत्न अपुरे पडले
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये काही व्हिडीओ हे जंगली प्राण्यांचे असतात. यात त्यांच्या जीवनशैली सह जंगलात जगतांना त्यांना कोण कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो याची माहिती मिळते. तसे जंगल म्हटल्यावर आज चा दिवस तुम्ही बघितला पण उद्या तुम्ही जिवंत असाल हे सांगता येत नाही. कारण जंगलात सिंह, वाघ ,बिबट यासारखे हिंस्त्र पशु असतात. ते शिकारीत माहीर असतात.
एकदा कोणतेही जनावर त्यांच्या टप्प्यात आले की मग त्याला जीव वाचवणे शक्य नसते. हे प्राणी अनेक वेळा समूहात शिकार करतात. त्यांची व्युव्ह रचना फारच जबरदस्त असते. यात सिंह म्हटलं की मग विचारायला नको. सिंहाच्या कळपा द्वारे शिकारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ते एका म्हशींच्या कळपावर हल्ला करतात. आणि एका बछड्याला आपली शिकार बनवतात . बछड्याला वाचविण्यासाठी एक म्हैस येते. पण वाघीण तिला पंजा मारून पळवून लावते. सिंहाच्या या कळपाला म्हशीला जणू हे सांगायचे आहे की आमच्या मधात पडायचा विचारही करू नको.
यातील काही व्हिडिओंमध्ये सिंह जिराफाची शिकार करतो तर काहींमध्ये तो बिबट्याला मारतो. त्याच्या शक्तीपुढे मोठमोठे प्राणीही नथमस्तक होतात. त्याच वेळी, सिंह कधीकधी म्हशींना देखील पकडण्यास मागे हटत नाहीत. सहसा सिंह म्हशींना आपले शिकार बनवतात, परंतु कधीकधी म्हशी आपल्या शिंगांनी सिंहांना मारतात. सिंह आणि म्हशीच्या चकमकीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये म्हशींचा आणि सिंहाचा कळप दिसत आहे. एका सिंह म्हशींच्या कळपात घुसतो आणि एका म्हशीला पकडून बाजूला ओढत आपली शिकार बनवतो. यावेळी कळपातील दुसरी म्हैस त्याला वाचवायला येते मात्र तेव्हा सिंहिण त्याला जोरात चापट मारत तेथून पळवून लावते. तिला चापट मारताच तिला वाचवण्यासाठी आलेली म्हैस पळून जाते. जणू सिंहाचे कळप काहीही करून आपल्या शिकारीला सोडण्याच्या विचारात नाही. त्यांनी यावर ताव मारण्याच्या विचार आधीच आपल्या मनात केला असावा.
या व्हिडिओमध्ये समोर म्हशींचा कळप उपस्थित असल्याचे तुम्ही पाहू शकता. अशा परिस्थितीत, सिंह सहसा त्यांची शिकार करणे टाळतात. मात्र सिंहांच्या गटाने हिंमत दाखवत म्हशींच्या कळपावर हल्ला केला. सिंह आणि सिंहिणीने मिळून म्हशीचे बछडे पकडले. पण तेवढ्यात दुसरी म्हैस त्याला वाचवण्यासाठी आली. सिंहीणीने तिची शिकार आपल्या जबड्यात पकडली होती. अशा स्थितीत म्हैस जवळ येताना पाहून ती तिच्या पंजाने त्याला जोरात मारते. यानंतर मुलाला वाचवण्यासाठी आलेली म्हैस लगेच तेथून पळून जाते. पण यामुळे सिंह आणि सिंहीणीमध्ये काही फरक पडला नाही. काही वेळातच आणखी दोन सिंहीणी आणि एक सिंह येथे येतात.
म्हशींना जेव्हा खात्री पटते की आपण आपल्या साथीदाराला वाचवू शकत नाही तेव्हा त्या सर्व तिथून पळू लागतात. सिंहाचे कळप मात्र या पकडलेल्या म्हशीवर आपली पकड भक्कम करतात आणि त्याचा लुप्त उचलतात. म्हशींची हतबलता आणि सिंहाचे सामर्थ्य दर्शवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ @latestkruger नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इतरांना वाचवण्यासाठी त्यांनी भावाचा त्याग केला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शक्ती म्हणजे जगावर राज्य करणे”.