हटके

गवत कापतांना घडली दुर्घटना ; गुप्तांग कापल्या गेल्याने तरुणाचा मृत्यू 

Spread the love

                    मशनरीज (यंत्र) हाताळताना ती काळजीपूर्वक  हाताळण्याचा सल्ला नेहमीच टेक्निशियन कडून दिला जातो. पण काम करणारा व्यक्ती कामात गुंग असल्याने किंवा लवकर काम आटोपण्याच्या मानिसकतेमुळे अश्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अश्या लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागते. अशीच घटना थायलंड च्या नोग बुआ लांफु येथे घडली आहे. येथे गवत कापणाऱ्या व्यक्तीचे गुप्तांग छाटल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

गवत कापण्याच्या मशिनचं पातं उडून एका व्यक्तीचं गुप्तांग छाटलं गेलं. थायलंडमधली इसान भागातील नोंग बुआ लांफू इथे ही दुर्घटना घडली आहे. जंगली प्रदेशात गवत आणि झुडपं कापत असताना हा प्रकार घडला आहे. प्रदीतसीन चुयपाद (39 वर्षे) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

पोलीस स्टेशनला जेव्हा हा प्रकार कळाला तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत चुयपाद अतिरक्तस्त्रावामुळे बेशुद्ध पडला होता. त्याच्या शरीराजवळ पोलिसांना गवत कापण्याचं मशिनही दिसलं. ते मशिन बारकाईने पाहिलं असता पोलिसांना कळालं की ते मशिन खरंतर धातू कापण्यासाठीचं होतं.

चुयपादचा मृत्यू नेमका कशाने झाला हे माहिती करण्यासाठी त्याची पँट काढली असता त्याचं गुप्तांग छाटलं गेल्याचं दिसून आलं. मशिनचं पातं अधिक धारदार असल्याने चुयपादचं गुप्तांग झटक्यात कापलं गेलं असावं असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.

चुयपाद याला गवत कापण्यासाठी कंत्राटी पद्धतीने बोलावण्यात आलं होतं. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला तो त्याचा शेवटचा दिवस होता. या जंगली पट्ट्याची देखभाल करणाऱ्या वाएन विसेत्सकदा यांनी म्हटले की धातू कापायचे ब्लेड वापरल्याने गवत कापण्याचे काम लवकर होईल असे बहुधा चुयपादला वाटले असावे. यामुळे त्याने हे ब्लेड निवडले होते. वाएन याने चुयपादला वाचवण्यासाठी बराच प्रयत्न केला, मात्र त्याच्या मदतीला कोणी नसल्याने आणि वेळेत मदत न मिळाल्याने तो काही करु शकला नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close