सामाजिक

वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक संदेश

Spread the love

यवतमाळ / प्रतिनिधी

यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत खारोला, ता. जि. यवतमाळ येथे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार लोकनेते मा. बाळासाहेब मांगुळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रकाश भाऊ लंगोटे, दीपक भाऊ मेश्राम आणि मित्रपरिवार, यवतमाळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले आणि समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली.रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे, असे मानत या उपक्रमाने अनेक गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला गेला.

शिबिरादरम्यान,यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.बाळासाहेब मांगुळकर स्वयं उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.तसेच त्यांनी आयोजकांचे आभार मानले.या उपक्रमाने सामाजिक जाणिवा जागृत करण्याबरोबरच एक आदर्श संदेश दिला आहे की, वाढदिवस साजरा करण्याचा आनंद सामाजिक कार्याशी जोडल्याने अधिक वाढतो.

प्रकाश भाऊ लंगोटे, दीपक भाऊ मेश्राम आणि मित्रपरिवाराचे या उपक्रमासाठी मनःपूर्वक मनभरून कौतुक!

🚩माऊली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
I3