मेरी माटी मेरा देश अंतर्गत शहरातून निघाली अमृत कलश यात्रा

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील नगर परिषद नगर प्रशासन , विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद व शहरातील काही सेवाभावी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या प्रांगणातून भव्य दिव्य अशी मेरी माटी ,मेरा देश अमृत कलश यात्रा काढण्यात आली,
मेरी माटी मेरा देश अमृत कलश यात्रेला माजी आमदार रमेश जी बुंदिले मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत उरकुंडे, मनोहर मुरकुटे माजी नगरसेविका सौ सुनीता मुरकुटे, प्रशासकिय अधिकारी नेवाडे , मनीष मेन, मुख्याध्यापक गुलाब सर , आरोग्य निरीक्षक प्रतीक वाटाणे,लोकजागरचे आनंद संगई , देवानंद महले, संजय धारसकर, संगीता मेन, जवरडीकर सर व त्यांची चमू यांनी कलश यात्रेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली
याप्रसंगी अमृत कलश यात्रेमध्ये शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक शिक्षक वृंद, आरोग्य निरीक्षक, लोकजागर संघटना , माजी नगरसेवक, न प चे कर्मचारी, सफाई कामगार व गणमान्य व्यक्तींनी विशेष सहभाग घेतला होता.
आपल्या भारत देशाच्या रक्षणासाठी ज्या .७५ हजार वीर शूर सैनिकांनी देशासाठी लढत असताना सीमेवर बलिदान दिले त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व त्यांची अमरजोत ही कायम राहावी या उद्देशाने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश हे अभियान संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे त्यासाठी संपुर्ण देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक घराघरातून त्या गावातील मूठभर माती ही अमृत कलशात भरून ती माती दिल्ली येथील शहीद स्थळी पोहचून त्या ठिकाणी अमृत कलशातील माती अर्पण करून त्या ठिकाणी देशवासियांकडून आदरांजली अर्पण करण्याची या यात्रेची मुळ संकलपणा आहे त्यासाठी आज ही अमृत कलश यात्रा नगर परिषद प्रांगणातून काढण्यात आली होती
सदरची कलश यात्रा ही शहरातील गुलजारपुरा, पानआटाई ,शनिवारा पेठ, आलम चौक, पाचपावली या मार्गे जात असताना शहरात ठिकठिकाणी अमृत कलश यात्रेचे पूजन करून स्वागत करण्यात आले अमृत कलश यात्रेचा शेवट हा नगरपरिषदेच्या प्रांगणात आला