सामाजिक

‘ मेरी माटी…मेरा देश ‘ अंतर्गत, शेंदूरजना घाट शहरात काढण्यात आली अमृत कलश यात्रा

Spread the love

... शेंदूरजना घाट :/ दिनेश मुळे

नगर परिषद शेंदुरजना घाट तर्फे केंद्र शासनाच्या मेरी माटी ..मेरा देश.. या अभियाना अंतर्गत भव्य दिव्य अमृत कलस यात्रा काढण्यात आली. नगर परिषदेने सुंदर असा चित्ररथ सजवून व त्यामध्ये कलश ठेवून संपूर्ण शहरात म्हणजे शाळा क्रमांक एक पासून विंचुरकर चौक ,मलम छावणी ऑटो चौक मार्गे बाजार ते माता चौक, कसाई मोहल्ला पासून वाई रोड ते मलकापूर आठवडी बाजारा, नगरपरिषद कार्यालय येथे समारोप करण्यात आला या अमृत कलश यात्रेला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री रविंद्र पाटील व पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री इंगळे साहेब यांनी तिरंगा ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला .या कलश यात्रेत आदिवासी महिला बचत गटाचे कलापथक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले व शाळा क्रमांक एक, दोन व चार चे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी राणी लक्ष्मीबाई ,महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले ,झाशीची राणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज ,यांच्या वेशभूषा सादर केल्या, गावातील व्यावसायिक नागरिक आणि बचत गटाच्या महिला शाळेचे शिक्षक व शिक्षका यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदऊन अमृत कलश मध्ये आपल्या घरातील माती व तांदूळ अर्पण केले. स्वातंत्र्याच्या महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोप निमित्य अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोप निमित्त संपूर्ण देशात व राज्यात मेरी माटी.. मेरा देश अर्थात माझी माती …माझा देश अभियान राबविण्यात आले .त्यानंतर मुख्याधिकारी श्री रवींद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन नगर परिषदेचे आवारात वीरांना नमन म्हणून शीला फलक लावण्यात आले, पंचप्राण प्रतिज्ञा अमृत रोपवाटिका वीरांना वंदन यासारखे उपक्रम राबविण्यात आले .अभियाना अंतर्गत अमृत कलश यात्रेचे नगर परिषद शेंदूरजना घाट येथे सांगता करण्यात आली .शहरातील माती व तांदुळ एकत्रित करून अमृत कलश दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सन्मानपूर्वक जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे पोहोचविण्यात येणार आहे. देशाच्या वीरांना नमन,याच्या स्मरणार्थ दिल्लीत उभारलेल्या हुतात्मा स्मारक येथे या कलश मधील माती आणि तांदूळ पेरून या ठिकाणी अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे या अमृत कलश यात्रेत नगर परिषद मुख्याधिकारी श्री रवींद्र पाटील सर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री इंगळे साहेब व पोलीस कर्मचारी बांधव प्रशासकीय अधिकारी अमोल ढोले न.प.चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास आठवले लेखापाल प्राजक्ता मेश्राम अभियंता श्री डेहनकर सर दिपक दवंडे , महेश पोटे, प्रितम सोनटक्के, विक्रम रेवतकर, पुनम डहाके श्वेता फुले निसार अहमद . जयस्वाल निखिल पवार विक्रम रेवतकर विक्रम खोडके नीताताई हमाने नरेंद्र वासनिक समाधान काटे नगर रचनाकार अमय वानखडे कुणाल आठवले शहर उपजीविका केंद्राच्या सचिव नीता पोटे. व्यवस्थापक मेघा मोहल्ले. लेखाव्यवस्थापक सविता घोरपडे वस्ती स्तर संघाच्या जिजाबाई बोरकुटे निर्मलाबाई घोरपडे व रजनी गणोरकर सुनीता उईके बऱ्याच बचत गटाच्या व वस्ती स्तर संघाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या अमृत कलश यात्रेला सहकार्य केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close