खेळ व क्रीडा

अमरावती विद्यापीठाचा सॉफ्टबॉल संघात भाकीत,तन्मय,रोहीत, सर्वेश,संघात निवड .

Spread the love

अमरावती विद्यापीठाचा सॉफ्टबॉल संघात भाकीत,तन्मय,रोहीत, सर्वेश,संघात निवड .

अरविंद वानखडे 
यवतमाळ
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सॉफ्टबॉल संघ जाहीर.
देशाच्या पातळीवर राष्ट्रीय विद्यापीठ समावेशक सॉफ्टबॉल स्पर्धा, सौंदर्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्स बंगलुरु कर्नाटक येथे दिनांक १३/०५/२०२४ ते १८/०५/२०२४ दरम्यान अखिल भारतीय विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा म्हणून संपन्न होणार आहे. त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा संघ सुद्धा सहभाग घेणार आहे. या अमरावती विद्यापीठ संघात यवतमाळच्या जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेत सराव करणारे भाकीत उमेश मेश्राम, रोहीत उमेश मेश्राम, सर्वेश राजेश इंंजाळकर, तन्मय धनराज पुरके या चार खेळाडूंची निवड झाली. या खेळाडूंच्या निवडीबद्दल संघटनेचे सचिव प्रा. डॉ. विकास टोणे यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे सर्व कनिष्ठ व वरिष्ठ खेळाडूंनी सुद्धा राष्ट्रीय विद्यापीठ अजिंक्यपद पटकावण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close