अमरावती स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणची शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कार्यवाही
दत्तराज इंगळे / मोर्शी
आज दि. 10 जून रोजी पोलीस स्टेशन शिरखेड हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन आरोपी शिवा मनोहर जामठे यास होंडा ॲक्टिवा कंपनीच्या मोटार सायकल वरून अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करताना पकडुन नमूद आरोपीच्या ताब्यातून 180 एम एल चे देशी दारूचे एकूण 408 नग किंमत अंदाजे 40,800/- रू. आणि देशी दारू वाहतूक करण्याकरीता वापरलेली ॲक्टिवा मोपेड विना क्रमांकाची किंमत 50,000/रु असा एकूण 90,800/रु.चा मिळून आल्याने सदर दारूचा मुद्देमाल ताब्यात घेऊन नमूद आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ), 65(ई) अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून पुढील कार्यवाही करिता आरोपी शिवा मनोहर जामठे, वय 26 वर्ष, रा. रिद्धपूर यास मुद्देमालासह पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.तसेच निंभार्णी घाटातून अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमांवर LCB अमरावती ग्रामीण ची कारवाई.दि.10 जून रोजी मोर्शी उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय बतमिवरून पोलीस स्टेशन शिरखेड़ हद्दीतील राजुरवडी ते नेर पिंगळाई रोडवरील शिलरस फाटा येथे ट्रॅक्टरने विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमावर रेड करून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या 1 ब्रास रेतिसह ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली असून नमूद आरोपीतांचे नाव 1) गौरव राऊत, वय 23 वर्ष रा. दापोरी, ता. तिवसा, अमरावती ( ट्रॅक्टर चालक) 2) सचिन विनोदराव डोळस, रा. निंभारणी, ता. मोर्शी, जि. अमरावती. (फरार ट्रॅक्टर मालक)
आरोपिविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून आरोपीसह 5,05,000 रू. चा जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाही करिता पोलीस स्टेशन शिरखेड़ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 50 किलोमीटर अंतरावरून येऊन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कारवाई करतात तर स्थानिक पोलिसांना हे अवैध धंदे करणारे का दिसत नाही असा नागरिकांन कडून असा सूर निघत आहे.
सदरची कार्यवाही ही तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली
नितीन चुलपार,संतोष मुंदाणे,रवींद्र बावणे,पंकज फाटे, यांनी केली.